DNA मराठी

Maharashtra Politics

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले-मुली शिक्षण घेत असुन त्या ठिकाणी शिक्षणासोबत मुलांकरीता हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही शाळा चालू असताना सदर शाळेने कोणतेही मान्यता असलेले फलक लावण्यात आले नसुन यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते असे आमचे निदर्शनास आले आहे. सदरील गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असुन सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये याकरीता आपण योग्य ती कारवाई करावी. याबाबत चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा Read More »

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी 3 सदस्यांचा सहभाग असलेल्या 20 समिती स्थापन केल्या असून दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या 20 समिती 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.   सर्व 20 समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार

Maharashtra Government: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सुधारित जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार नाही. तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार अनेक शासकीय विषयात समावेशअनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारशासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. काय म्हणाले बावनकुळे?सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल.

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार Read More »

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले

Jitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. या दाव्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या या दाव्यावर संताप व्यक्त करत हल्लबोल केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय.” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे. इतकेच नाही तर आव्हाडांनी छत्रपती शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. आव्हाड यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे”. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल”, असा इशाराही आव्हाडांनी पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. चक्क लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती असेही ते म्हणाले. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले होते. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो. असं या मुलाखतीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले.

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले Read More »

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन

Maharashtra Keshari 2025 : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन करण्याचे निर्णय घेतला आहे. पंचांच्या निर्णय अमान्य असल्याने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घातला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे मोठा निर्णय घेत दोघांना तीन वर्षांसाठी निलंबन केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन Read More »

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, लहान किंवा फाटलेले कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांनी सभ्य आणि पारंपारिक कपडे घालून मंदिरात यावे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 30 जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा नवीन ड्रेस कोड नियम लागू होईल. या नवीन व्यवस्थेनुसार, स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धेचे केंद्र आहे. लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु, जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा तेथे काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या काही भाविकांच्या पोशाखाबद्दल अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यांचे कपडे योग्य नव्हते. हे लक्षात घेऊन, सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगले कपडे घालावे लागतील. हा राजकारणाचा विषय नाही. हा धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते सहसा स्नान करून आणि चांगले आणि सभ्य कपडे घालून जातात. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे. अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागूआचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागू आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांना या नियमांची आधीच माहिती आहे. आम्हाला खात्री आहे की कालांतराने, सिद्धिविनायक मंदिरातही लोक हळूहळू या नियमांचे पालन करू लागतील. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »