DNA मराठी

Maharashtra Politics

crime

Jalna Crime : धक्कादायक, क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग; आरोपीला अटक

Jalna Crime: जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. तर शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.

Jalna Crime : धक्कादायक, क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग; आरोपीला अटक Read More »

savedi maharashtra til adarsh scam dna marathi

सत्य लपवण्याचा ‘फेरफार’?

Sawedi land scam – प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. Sawedi land scam – अहिल्सायानगर – सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ मधील वादग्रस्त हाडाचा कारखाना आणि त्यासंबंधित फेरफार क्रमांक ७३१०७ प्रकरणात अखेर अहवाल सादर झाला, मात्र तो “फेरपुनरावलोकन” या शिफारसीपलीकडे फारसा पुढे गेलेला नाही. गेले काही महिने याबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना प्रशासनाने केवळ पुनरावलोकनाची शिफारस करणे म्हणजे प्रकरण हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न आहे, असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. ही कारवाई म्हणजे ‘समस्या सोडवणे’ नव्हे तर ‘विलंब करा आणि विसरायला लावा’ अशा शैलीतील जुन्या धोरणाचे उदाहरण आहे. दस्तऐवज बनावट असल्याचे आरोप, खरेदीखत संदिग्ध असल्याचे पुरावे, आणि हस्ताक्षर बनावट असल्याचा स्पष्ट आरोप असूनही, ही बाब गंभीरपणे न घेता तिचा फेरपरीक्षण करून ‘नवीन पेपर तयार करून जुने पेपर’ झाकून टाकण्याचा प्रयत्न होत केला जात आहे. कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय? अहवाल अद्याप अधिकृतरित्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नसतानाही, त्यातील गोपनीय बाबी आधीच संबंधित गटांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शहा गटाशी संबंधित काही व्यक्तींनी तत्काळ प्रांत कार्यालयात धाव घेतल्याचे चित्र दिसून आले. ही बाब केवळ संयोग नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेमधील ‘फुटलेल्या नळांची साखळी’ पुन्हा अधोरेखित करणारी आहे. याचा थेट अर्थ असा होतो की, अहवाल तयार होण्याच्या आधीच संबंधित व्यक्तींशी समन्वय साधला गेला असावा, आणि त्यांच्या ‘सोयीचा’ मजकूर त्यामध्ये उतरवण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासनाच्या मूळ मूल्यांनाच सुरुंग लावणारा असून, यामुळे कारवाई होण्याऐवजी ‘जुळवून घेण्याची’ यंत्रणा सक्रिय आहे, हेच सिद्ध होते. चूक दुरुस्ती लेख – सत्य झाकणारा मुखवटा या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या “चूक दुरुस्ती लेखा”मध्ये मूळ सर्वे नंबर आणि क्षेत्रफळ कायम ठेवत नव्याने दुसरा सर्वे नंबर देण्यात आला, आणि त्यात क्षेत्रफळही वाढवण्यात आलं. हे करताना ज्या व्यक्तीची संमती घेतल्याचा दाखला आहे – त्याच व्यक्तीने “सही माझी नसल्याचा” दावा केला आहे. याहून गंभीर आणखी काय असू शकते? फक्त पुनरावलोकन पुरेसं नाही पुनरावलोकन म्हणजे एका चुकीच्या फाईलला दुसऱ्या फाईलने झाकणे. ही केवळ वेळकाढूपणाची कारवाई आहे. प्रशासकीय कागदोपत्री चुकांमागे नेहमीच एक हेतू असतो – आणि या प्रकरणात तो हेतू कोणाचा फायदा करण्यासाठी होता, हे तपासण्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. केवळ अहवाल लिहून आणि पुन्हा चौकशीचा सल्ला देऊन जबाबदारी झटकली जाणार असेल, तर यंत्रणेच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा राहतो. लोकशाहीत विश्वास नसेल तर काय उरते? प्रशासन जर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांना वाचवत असेल, गोपनीय माहिती लीक होत असेल आणि बनावट कागदांवर स्वाक्षऱ्या केल्या जात असतील – तर या सगळ्याच्या मुळाशी असलेला जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वासच उडतो होतो. ही बाब केवळ सावेडीपुरती मर्यादित नाही; ही एक सिस्टम फेल्युअर ची लक्षणं आहेत. चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात… आता या अहवालावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहून संबंधित दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली नाही, तर सावेडी हे प्रकरण इतर शहरातील जिल्हातील आणि इतर जिल्हातील भूमिगत भ्रष्ट व्यवस्थांना नवा आत्मविश्वास देईल. शेवटी एकच प्रश्न उरतो – फेरफाराचा अहवाल आला, पण न्याय कुठे आहे?

सत्य लपवण्याचा ‘फेरफार’? Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान

Rahul Gandhi on PM Modi: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर होत असलेल्या चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगावे असे आव्हान केले आहे. या चर्चेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध थांबवले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगतील. असं राहुल गांधी म्हणाले. तसेच सरकारने सांगितले की ही कारवाई पहाटे 1.27 वाजेपर्यंत सुरू होती. पाकिस्तानला 1.35 वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. ही माहिती थेट पाकिस्तानला का देण्यात आली? तुम्ही पाकिस्तानला सांगितले की तुम्हाला लढायचे नाही. सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. आम्ही 30 मिनिटांत शरणागती पत्करली. सरकारकडे लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केल. तर भारतीय सैनिक वाघ आहेत. वाघांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. जर सैनिकांना देशासाठी काम करायचे असेल तर त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. मी राजनाथ सिंह यांचे भाषण ऐकले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 शी केली. राहुल म्हणाले की, 1971 मध्ये सरकारकडे इच्छाशक्ती होती. 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचे ऐकले नाही. असा टोला देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लावला. मी पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवण्याचे म्हटले होते. सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले. खरी लढाई चीनशी होती. पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. पाकिस्तान आणि चीनने हातमिळवणी केली. सरकारला वाटले की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. प्रत्यक्षात आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत. असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान Read More »

img 20250729 wa0004

अजित पवारांची मोठी खेळी, प्रहार,वंचित अन् उबाठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: अकोला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती आणि वंचित आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व हिंगोलीतील माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. आमदार अमोल मिटकरी यांच्या नेतृत्वाखाली वंचित आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तर वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली वसमत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आज प्रवेश केला. यामध्ये प्रहारचे अकोला उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील, पातुर तालुकाप्रमुख सतिश नेहवाल, बाळापूर युवक तालुकाध्यक्ष भूषण पारसकर आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी तर वसमत नगर परिषदेमधील नगराध्यक्ष वैजनाथ गुंडाळे, उबाठा गटाचे गटनेता दिलीप हाळवे पाटील, नगरसेवक धनंजय गोरे, वसंत चेपुरवार आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार राजू नवघरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

अजित पवारांची मोठी खेळी, प्रहार,वंचित अन् उबाठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Devendra Fadnavis: राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थापन होणार विशेष न्यायालय

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष खाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयानुसार राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्यात येणार आहे. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार आहे. तसेच ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ आता उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. याच बरोबर राज्यात ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नामांकित बाजारस्थळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना होणार आहे.

Devendra Fadnavis: राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये स्थापन होणार विशेष न्यायालय Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar : जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा

Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत सांगितले की,  जातीय जनगणना रोखणं ही चूक नव्हे, हा तर ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर केलेला कित्येक दशकांचा गुन्हा आहे. ॲड. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हा मोठेपणाचा देखावा थांबवा. तुम्ही म्हणता की जातीनिहाय जनगणना न झाल्याची चूक केवळ तुमची आहे आणि त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला नाही. राहुल गांधी, सर्वप्रथम हे समजून घ्या की ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला एक गुन्हा आहे आणि हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी  या सगळ्यांनी मिळून दशकानुदशके बहुजनांवर केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढील मुद्द्यांकडे लक्ष वेधले • तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला. • तुमचे वडील राजीव गांधी मंडल आयोग लागू करण्यास आणि ओबीसींना आरक्षण देण्यास  विरोधात होते. याचे पुरावे त्यांच्या लोकसभेत दिलेल्या भाषणांमध्ये सापडतात. माझे मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान वी. पी. सिंग, माझे सहकारी आणि मी मिळून मंडल आयोगाच्या शिफारसी आणि ओबीसींसाठी 27% आरक्षण लागू केलं. • तुमची आई सोनिया गांधी, ज्या यूपीए आघाडीच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी यूपीए सरकारमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा दाबून ठेवला. 2011 मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जात नोंदवण्याची मागणी केली, तेव्हा तुमची काँग्रेस पार्टी आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीचा विरोध केला. जातीय जनगणनेची मागणी वाढल्यावर शेवटी हार मानून तुमच्या पक्षाने जनगणना केली, पण आजपर्यंत त्या जनगणनेचे आकडे तुम्ही जाहीर केलेले नाहीत. राहुल गांधी, ना तुम्ही दलित समाज समजू शकता, ना त्यांच्या समस्या. हीच बाब आदिवासी, ओबीसी आणि भारतातील अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध समाज यांच्या बाबतीतही लागू होते. फक्त फोटोशूट करून आणि “जय भीम” ओरडून कोणालाही बहुजनांच्या समस्या समजत नाहीत. आणि हो, पुढच्यावेळी अर्धवट खोटं नाही, तर पूर्ण सत्य बोला !तेही बोला की बहुजनांना वंचित ठेवण्याच्या गुन्ह्यात तुमच्या आजी इंदिरा गांधींपासून, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी सर्वजण सहभागी आहात.

Prakash Ambedkar : जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा Read More »

img 20250727 wa0005

Ahilyanagar News : “बनावट कागद… खऱ्या आयुष्याची राख”

Ahilyanagar News : – बनावट दस्तऐवज तयार करणे, खोटी प्रमाणपत्रे सादर करणे, बनावट आधारकार्ड वापरणे ही केवळ फसवणूक नव्हे, तर समाजाच्या मूलभूत विश्वासावर केलेली गद्दारी आहे. विशेषतः अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यात या प्रकारांना सध्या उघडपणे खतपाणी घातले जात आहे. कारण एकच कारवाईचा अभाव आणि प्रशासनाचा ढिसाळपणा. आपल्याकडे आधारकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय दस्तऐवज आहे. त्याचा वापर ओळख, बँकिंग, जमिनीच्या व्यवहारात, रेशन, शिक्षण, नोकरी यासाठी होतो. पण आज बनावट आधारकार्ड सहज बाजारात मिळतात. एखाद्याने बनावट आधार वापरून दुसऱ्याच्या जमिनीवर खरेदीखत केले, ताबा घेतला, आणि मूळ मालकाने विरोध केला, तर उत्तर मिळते “तुम्ही कोर्टात जा.” विशेष म्हणजे आता फक्त बनावट प्रमाणपत्रे, खरेदीखत किंवा आधार कार्ड पुरेसे राहिलेले नाही, तर थेट बनावट शासकीय निर्णय (GR) तयार होऊन त्यावर कोट्यवधींचा निधी वळता केला जातो. हे GR कागदोपत्री अधिकृत भासत असल्यामुळे अनेक खात्यांमधून निधी वितरितही होतो. परंतु जेव्हा वास्तव समोर येतं, तेव्हा फक्त एखाद- दुसरा गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर सारं शांत. कुणालाच शिक्षा नाही, कुणाला चौकशी नाही. कारण प्रत्येकजण कुणाच्या ना कुणाच्या संगनमतात सामील असतो. या खेळात हारते ती फक्त जनता जी कर भरते, मत देते, पण न्याय मात्र मिळत नाही. हे उत्तर म्हणजे सामान्य नागरिकाच्या वेदनेची थट्टा आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये बनावट अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या मिळाल्याची प्रकरणे उघडकीस आली. फक्त एक प्रकरणात गुन्हा दाखल झाला, त्यापुढे मात्र सर्व काही ‘जैसे थे’. याच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातही बनावट अपंग प्रमाणपत्रे आढळली, पण पुन्हा त्यावरही कारवाई ‘नाही’. याचा अर्थ स्पष्ट आहे. बनावट उद्योग थांबवण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही. बनावट दस्ताऐवजांचा सर्वात मोठा बळी ठरतो, तो सर्वसामान्य नागरिक. ज्याने प्रामाणिकपणे जमिन खरेदी केली, त्याला एक दिवस कळते की दुसऱ्याच नावाने त्याचे खरेदीखत झाले आहे. कारण बनावट आधार. त्याच्या आयुष्याचा पाया हादरतो. नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्र, बनावट डिग्री, बनावट अनुभव दाखवणारे पुढे जातात, आणि योग्य पात्र उमेदवार मागे राहतो. शासकीय अधिकारी म्हणतात अपील करा. मंत्री सांगतात “मी बघतो.” पण सामान्य माणसाला हे ‘बघणे’ जन्मभर पुरते. या देशात खरे व चुकीचे ठरवण्याची गती इतकी संथ का आहे? लोकशाही जर सर्वसामान्यांच्या मतावर चालते, तर ही लोकशाही त्यांच्यासाठी काम का करत नाही? आता वेळ आली आहे की बनावट दस्त तयार करणाऱ्यांविरोधात फक्त गुन्हे दाखल करून शांत बसण्यापेक्षा कठोर कारवाई व्हावी. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती हवी, कारवाईला वेळमर्यादा हवी आणि दोषींना उघडपणे शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा ‘बनावट’ हेच खरे होईल, आणि खरं असलेले कायमच भरकटत राहील. खोटेपणावर उभी राहिलेली व्यवस्था लोकशाही नव्हे, ती अराजकतेची पायवाट आहे. ती थांबवायची असेल तर आता निदान प्रामाणिकपणाचा आवाज ऐकला गेला पाहिजे.

Ahilyanagar News : “बनावट कागद… खऱ्या आयुष्याची राख” Read More »

saturn's support to quell the political sade sati of ministers

मंत्र्यांची राजकीय साडेसाती शमवण्यासाठी शनि पूजनाचा आधार

मुंबई / नंदुरबार / शनिशिंगणापूर – राज्यातील दोन मंत्र्यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) – शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होत.  राजकीय वाद, आरोप आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शांतीसाठी शनिपुढे शरणागती पत्करली आहे. यामुळे ‘राजकीय साडेसाती’ टाळण्याचा अध्यात्मिक मार्ग शोधला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी प्रकरण, ‘शासन भिकारी’ विधान, आणि आता शनी पूजन, जोरात माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार येथील शनि मंदिरात विशेष पूजा केली. विधानसभेत अधिवेशन चालू असताना मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व्हिडिओ x वर   व्हायरल केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. त्यावर काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि इतरांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट  साडेसातीमुक्तीसाठी शनिदेवाला साकडं घातलं. त्यातच कोकाटे यांनी केलेलं वादग्रस्त विधान – “शासनच भिकारी आहे” – यामुळे त्यांच्यावर अधिक टीका झाली होती. सुप्रिया सुळे व शेतकरी संघटनांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर “योग्य ती कारवाई होईल,” असा सूचक इशारा दिला आहे. मंत्री संजय शिरसाट – शनिशिंगणापूरच्या देवळात भावनिक दर्शन, पण राजकीय सावट कायम तर दुसरीकडे, शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी कौटुंबिक संकटांबरोबरच त्यांची पैसेची बंग असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरूनही राजकरण चांगलेच तापले होते, त्यामुळे जकीय अडथळ्यांपासून सुटका मिळावी या हेतूने शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतले. तेल अभिषेक, कुटुंबासह विधी, आणि आत्मिक शांतीसाठी प्रार्थना करताना त्यांची भावनिक स्थिती स्पष्ट जाणवत होती. मात्र, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कोकाटे व शिरसाट यांच्यावर टिकेचा बाण सोडला. “नेते संकटात आले की देवाची आठवण होते, पण जनतेसाठी कधी शरण जातात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकीय पार्श्वभूमी आणि विश्लेषण राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची कुजबूज सुरू असताना, कोकाटे व शिरसाट यांचे शनिदर्शन ही केवळ श्रद्धा नसून राजकीय संकेतांची भाषा आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एका बाजूला अध्यात्मिक आसरा, तर दुसरीकडे विरोधकांचा रोष – हे समीकरण आगामी राजकीय घडामोडींचा प्रारंभ ठरू शकते

मंत्र्यांची राजकीय साडेसाती शमवण्यासाठी शनि पूजनाचा आधार Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: विकासाला मिळणार गती, मुख्यमंत्री फडणवीसांची नीती आयोगाला भेट

Devendra Fadnavis: राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसेच नीती आयोगाशी या बैठका झाल्या. अमित शहा आणि राजनाथसिंग यांची सदिच्छा भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसेच विषयांवर त्यांनी चर्चा केली. सुमारे 25 मिनिटे ही बैठक चालली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. निर्मला सीतारामन यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली. या प्रकल्पांमध्ये 1000 लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8651 कोटी रुपये) इतके आर्थिक सहाय्य मागण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍याची पातळी वाढत असल्याने त्याचे नैसर्गिक उपायांनी निराकरण करणे हा आहे. यासाठी 500 मिलियन डॉलर्स (सुमारे 4326 कोटी रुपये) इतकी मदत मागण्यात आली आहे. तिसरा प्रकल्प महापालिका शहरांमधून सांडपाण्याचा प्रक्रिया करुन उद्योगांसाठी पुनर्वापर हा आहे. यासाठी 500 मिनियन डॉलर्सचे (सुमारे 4326 कोटी रुपये) अर्थसहाय्य मागण्यात आले आहे. उर्वरित दोन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मदत मागण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी वित्तमंत्रालयाने मंजुरी द्यावी, यासाठीचे निर्देश निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला वित्त विभाग सचिव अनुराधा ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होत्या. विदर्भात खताचा प्रकल्प, जे. पी. नड्डा यांच्याशी भेट केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीत विदर्भात एक खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. नागपूर जिल्ह्यात गेल, फर्टिलायझर विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा 12.7 लाख टनाचा प्रकल्प असणार आहे. सुमारे 10,000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी सबसिडी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या. फर्टिलायझर विभागाचे सचिव रजतकुमार मिश्रा यावेळी उपस्थित होते. 14,000 कि.मी.चे ग्रामीण रस्ते, शिवराजसिंग यांच्याशी भेट महाराष्ट्रात 14,000 कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे. हा एकूण प्रस्ताव 2.6 बिलियन डॉलर्सचा (सुमारे 22,490 कोटी रुपये) असून, यातच एडीबीचे सहाय्य घेण्यात येणार आहे. 25 वर्ष मेंटेनन्स फ्री या तत्त्वावर हे रस्ते उभारण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, यातून त्यांना चांगली कनेक्टिव्हीटी मिळेल, असे शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले. या प्रकल्पाला मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वेक्षणाचे काम अतिशय गतीने केल्याबद्दल शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक 30 लाख घरे केंद्र सरकारने मंजूर केली आहेत, हे याठिकाणी उल्लेखनीय. नीती आयोगाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव गौबा यांची भेट घेतली. एफआरबीएम मर्यादा 25 टक्के असताना महाराष्ट्राने 18 टक्के इतकी ती राखल्याबद्दल नीती आयोगाने प्रशंसा केली. एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसिज) स्क्रिनींगसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर, बांबू आधारित क्लस्टर (हे दोन्ही प्रकल्प प्रत्येकी 500 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे), मराठवाडा वॉटर ग्रीड आणि दमनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासह अन्य जलसंधारण प्रकल्प (सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स) तसेच महाराष्ट्रातील आयटीआयला खाजगी उद्योगांशी जोडून कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम इत्यादी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचे सादरीकरण झाले. या प्रकल्पांच्या परवानग्यांना गती देण्यात येईल, असे आश्वासन निती आयोगाने दिले.

Devendra Fadnavis: विकासाला मिळणार गती, मुख्यमंत्री फडणवीसांची नीती आयोगाला भेट Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate : हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता

Manikrao Kokate : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण ९ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इ.१२वी (विज्ञान) मध्ये ५०% गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११८वी बैठक नुकतीच पार पडली, याबैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५% आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४०% गुणांची अट लागू करण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत २७ जुलै २०२५ पर्यंत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. 12वीचे टक्के कृषीमुळे वाढणार केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ.१२ वी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल असून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी यांनी व्यक्त केला.

Manikrao Kokate : हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता Read More »