DNA मराठी

Maharashtra Politics

sawedi land scam all eyes on the district magistrate's decision

सावेडी प्रकरणात नवीन वळण — जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

जमीनखरेदीचा कालखंड, शेतकरी पुरावा व वापर स्वरूप आदी मुद्द्यांचा तपशील आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ‘घडलेला प्रकार चुकीचाच’ असल्याचं नमूद आहे. मात्र, त्याच अहवालात शहा यांच्या बाजूने झुकणारं माप देण्यात आलं आहे, असेही स्पष्ट दिसते. अहिल्यानगर – सावेडी येथील सर्वे नंबर २७९ आणि नंतरच्या वाटपानुसार २४५/ब/१ व २४५/ब/२ या जमिनींच्या खरेदी व्यवहारात अनेक तांत्रिक व कायदेशीर विसंगती समोर आल्या असून, त्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा लागली आहे. कारण या प्रकरणात सुरूवातीपासूनच महसूल प्रशासनातील विविध पातळ्यांवर संशयास्पद निर्णय घेण्यात आले असल्याचे चित्र आहे. अहवालांची साखळी – पण कारवाई कुठे? सदर तक्रारीनंतर प्रारंभी मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तक्रार झाल्यानंतर तो अहवाल अप्पर तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला. नंतर हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात संबंधित जमिनीवरील नोंदी, जमीनखरेदीचा कालखंड, शेतकरी पुरावा व वापर स्वरूप आदी मुद्द्यांचा तपशील आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ‘घडलेला प्रकार चुकीचाच’ असल्याचं नमूद आहे. मात्र, त्याच अहवालात शहा यांच्या बाजूने झुकणारं माप देण्यात आलं आहे, असेही स्पष्ट दिसते. अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईचा प्रस्ताव दिला नाही? या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, जमीन खरेदीवेळी व नंतर झालेल्या प्रक्रियेत जे अधिकारी/कर्मचारी दोषी ठरतात, त्यांच्यावर कोणतीही प्रशासनिक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली नाही. किवा कारवाई अपेक्षित असतानी त्यांनी कारवाई केली नाही. त्याऐवजी अहवालात त्यांच्या चुकीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत, शहा यांच्यासाठी अनुकूलता देण्यात आली आहे, असा ठपका स्थानिक तक्रारकर्त्यांकडून करण्यात आलाय. शेतजमिनीचा खरेदी व्यवहार – पण शेतकरी पुरावा कुठे? १९९२ मध्ये पारसमल मश्रीमल शहा यांनी ही जमीन खरेदी केली होती. त्यावेळेस ही जमीन ‘कारखाना’ किंवा ‘पडीक’ स्वरूपात सातबारा उताऱ्यावर दर्शविली गेली असली, तरी “बिनशेती” करण्यास शासनाची अधिकृत परवानगी कुठेही उपलब्ध नाही. कारखाना, हाडांचा कारखाना, कातडी रंगविण्याचा उल्लेख फक्त सातबारा उताऱ्यावर किंवा पीक पाहणी सदरी आहे, मात्र जमीन ‘बिनशेती’ करण्याचा कोणताही अधिकृत आदेश अथवा बिगरशेती परवाना उपलब्ध नाही. म्हणजेच, शहा यांनी जेव्हा जमीन खरेदी केली, त्या वेळी ती जमीन कायद्याच्या दृष्टिकोनातून ‘शेती’च होती. त्यामुळे शेतकरी असल्याचा पुरावा देणे अनिवार्य होते. पण शहा यांनी तो पुरावा दिला असल्याचा कोणताही दाखला अहवालात नाही. अप्पर तहसीलदारांनी ‘फेवर’ दिला? अहवालात अप्पर तहसीलदारांनी असा अभिप्राय दिला की, “खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा लागतोच असे नाही.” ते हे विधान फक्त सातबारा उताऱ्यावर कारखान्याचा उल्लेख आहे म्हणून करत आहेत. मात्र, हे विधान कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरते, कारण सातबारा उताऱ्यावर उल्लेख असला तरी तो परवानगीशिवाय ‘बिनशेती’ वापर असल्याचे स्पष्ट पुरावे नाहीत. परिणामी, शहा यांच्यासाठी हे गैरसोयीचे असूनही अप्पर तहसीलदारांनी शंका लाभार्थ्याच्या बाजूने वळवली आहे, असे चित्र आहे. कारखाना उल्लेख म्हणजे बिनशेती नाही – परवाना हवेच! महत्वाचे म्हणजे, शेतजमिनीवर हाडांचा कारखाना किंवा इतर औद्योगिक वापर फक्त परवानगीनेच केला जाऊ शकतो. जर सातबारा उताऱ्यावर फक्त “कारखाना” असा शब्द आहे आणि त्याला कोणतीही अधिकृत रूपांतरण मंजूरी (NA Order) नाही, तर ती जमीन बिनशेती म्हणून वापरणे हे अनधिकृत ठरते. यावर कलम ४५ नुसार दंडात्मक कारवाई होणे आवश्यक असताना, तशी कोणतीही कारवाई महसूल यंत्रणेकडून झालेली नाही, यामुळे प्रशासनातील पातळीवर शंका अधिकच गडद होत आहे. प्रकरणात महसूल कायदा, मुद्रांक अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार चौकशी, दंड व कारवाई आवश्यक असून जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावेडी प्रकरणात नवीन वळण — जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष Read More »

Rohit Pawar: MIDC मध्ये दादांची दादागिरी का? रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar: पुणे एमआयडीसी मध्ये दादागिरी सुरू असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की पुण्यातून अनेक कंपन्या जात आहे. तळेगाव, चाकण या परिसरातील कंपन्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असे म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यामध्ये एमआयडीसी मध्ये दादांची दादागिरी आहे का? दादाच्या पक्षाचे दादागिरी आहे की भाजपची दादागिरी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची दादागिरी आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला दादागिरी करता याची लवकरात लवकर नाव जाहीर करावी अशी मागणी रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर महायुतीमध्ये सगळं ऑल इज वेल नसल्याने एकनाथ शिंदे दिल्लीवारी करत आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे कुठेही गेले तर या तिन्ही महायुतीमध्ये सगळं ऑल इज वेल नाही असे दिसते. नेत्यांना चिडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने यांचा त्रास होऊ लागलेला आहे. विकासाचा दर खुंटला आहे. देवेंद्र फडणीस यांना सगळं माहीत असताना सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील भूमिका कदाचित भाजपची असावी अशी टीका रोहित पवार यांनी केली. तर कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी काम पण सरळ करावी लागतात, यांनी त्यांनी महाराष्ट्राचे तिजोरी वेडीवाकडी केली आहे, वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो, वाकड काम जर तुमच्या हातून झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही आम्ही तुम्हाला माफ करणार नाही असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar: MIDC मध्ये दादांची दादागिरी का? रोहित पवारांचा हल्लाबोल Read More »

एसटी स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाचा बोजवारा; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Maharashtra Congress: राज्यातील विविध एसटी आगार व बसस्थानक परिसरातील खड्ड्यांचे साम्राज्य दूर करण्यासाठी गतवर्षी एसटीच्या वर्धापन दिनी तातडीने काँक्रीटीकरणाचे आदेश देण्यात आले होते. यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) एसटीला देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीने निधी स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवून निविदा प्रक्रिया पार पाडली आणि एसटीला त्यात कोणताही सहभाग दिला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. बरगे यांच्या मते, पूर्ण झालेल्या १२६ आगारांपैकी तब्बल ३० टक्के ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसामुळे पुन्हा खड्डे व पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी व कर्मचारी दोघांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व आगार ‘खड्डेमुक्त’ करण्याचे आदेश दिले होते. तसेच, यासाठी एमआयडीसीकडून ५०० कोटी रुपये देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र हा निधी एसटीला वर्ग करण्यात न आल्याने कामावर एसटीचे नियंत्रणच राहिले नाही. परिणामी राज्यातील १९३ आगारांपैकी केवळ १२६ ठिकाणीच काँक्रीटीकरण झाले असून तेही ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत आहेत. खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्काबुक्की खात, आदळत प्रवास करावा लागत आहे. आवारात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरत आहेत. चालकांना गाड्या पार्किंग करताना त्रास होत असून यांत्रिकी कर्मचारी पावसाच्या पाण्यात काम करण्यास भाग पाडले जात आहेत. बरगे यांनी आपल्या पत्रात विचारले आहे की “जाहीर केलेला ५०० कोटींचा निधी एसटीकडे का वर्ग करण्यात आला नाही? एमआयडीसीच्या नियंत्रणाखालील या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला का? राज्यातील लाखो प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार?” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाची शासनस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एसटी स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाचा बोजवारा; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी Read More »

Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी, पर्यावरण मंजुरी, वन परवानग्या, मजूर कायदे, जमीनचे वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्‍ध करून दिल्या पाहिजे. उद्योगधंद्यांना सर्व परवानग्‌या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे, यासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात. त्याचबरोबर, उद्योजकांना शासकीय विभागांसदर्भात काही अडचणी असतील, तर त्यासंदर्भात निनावी तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट ‍निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्यांवर बैठक झाली. या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ‍ शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेशकुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बळगन, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्यासह अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्योगांकरिता त्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे. माजलगाव, दिघी, बुटीबोरी, चामोर्शी (गडचिरोली), जयपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि पीएम मित्रा (अमरावती) येथे वीज सबस्टेशनच्या उभारणी कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. उद्योगांसाठी वीज वहन आणि देखभालीच्या समस्यांसंदर्भात वेगळी व्यवस्था करण्यात यावी. पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मैत्री या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्या. त्याचप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने शेंद्रा -बिडकीन मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यासंदर्भात कार्यवाही करावी नवीन उद्योगांनी बुटीबोरी येथे जास्त पसंती दिली असल्याने या भागातील रोड कनेक्टिव्हिटी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. राज्यातील उद्योगांना कन्सेंट टू इस्टब्लिश व कन्सेंट टू ऑपरेट परवानग्या वेळेवर मिळाल्या पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्योगांना लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या बंद कराव्यात. उद्योग प्रतिनिधीच्या अनाहूत तपासण्या बंद कराव्यात. उद्योगांना जमीनी देण्यासंदर्भात निर्णय आणि परिपत्रक ते सुधारित करून एकत्रित करण्यात यावे. उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी,असे ‍ निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या ज्या भागात एमआयडीसी आहेत, त्या भागाला औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यात यावा. औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास दुहेरी करासारखी समस्या निकाली निघेल. उद्योगांना देण्यात येणारे पात्रता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीच्या संपादनासंबंधी तसेच विविध औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या व प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.

Devendra Fadnavis: उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

Eknath Shinde : भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी, एकनाथ शिंदेंची सडकून टीका

Eknath Shinde : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणुनबुजून अडकवून तब्बल 17 वर्ष त्रास देण्याचे काम काँग्रेसने केले. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. एनआयए कोर्टाच्या निकालाने हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणचा बुरखा फाडला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात जणांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय. ते पुढे म्हणाले की, मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी व्यवस्थेत आणला. यासारखा धादांत खोटेपणाचे त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे? अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय, असे ते म्हणाले. हिंदू सहिष्णू असतो मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसने राजकारण केले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Eknath Shinde : भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी, एकनाथ शिंदेंची सडकून टीका Read More »

Election Commission: ईव्हीएम छेडछाड अशक्य; विरोधकांना निवडणूक आयोगाचे उत्तर

Election Commission: भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही. या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले. काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले. निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Election Commission: ईव्हीएम छेडछाड अशक्य; विरोधकांना निवडणूक आयोगाचे उत्तर Read More »

manikrao kokate

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना धक्का, दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री

Manikrao Kokate: पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारा कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते देण्यात आले. तर कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर कोकाटे यांचं खातं बदलण्यात आले आहे. 28 जुलैला मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा झाली होती. या चर्चेत अजित पवार यांनी तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. असं कोकाटेंना म्हटले होते तर भविष्यात असं होणार नसल्याची ग्वाही माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना धक्का, दत्तात्रय भरणे राज्याचे नवे कृषिमंत्री Read More »

mahadev jankar

Mahadev Jankar : भाजपा सोबत युती करणे ही सर्वात मोठी चूक, महादेव जानकर स्पष्टच म्हणाले

Mahadev Jankar: भाजपा सोबत युती करणे ही भूतकाळातीर सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केल आहे. ते अकोल्यात बोलत होते. तर जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकोल्यात आले होते तर यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याच जानकर म्हणालेत. तर आता भाजपची काँग्रेस झाल्याचंही ते जानकर म्हणतात. इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचे आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपचे धोरण असल्याचे ते म्हणालेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचे ते म्हणालेत. तर ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही. त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष यांसह रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हणालेत. 2029 मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Mahadev Jankar : भाजपा सोबत युती करणे ही सर्वात मोठी चूक, महादेव जानकर स्पष्टच म्हणाले Read More »

शेतकऱ्यांना दिलासा, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता

Maharashtra Politics: राज्यातील शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त व वाजवी भाव मिळावा यासाठी ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र व राज्य शासन, कृषि उत्पन्न बाजार समितीतील कृषि उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावे यासाठी राज्यातील १३३ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवित आहे. कृषि उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाईन पद्धती कार्यान्वित करीत आहे. पण अजूनही राज्यात ई-नाम अंतर्गत “सिंगल युनिफाइड लायसन्स” ची तरतूद नसल्याने, इंटरमंडी व इंटर स्टेट ट्रेड सुरु होऊ शकलेले नाहीत. दरम्यान, केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने कृषि उत्पन्न आणि पशुधन पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, २०१७ (मॉडेल अॅक्ट) प्रकाशित केला आहे. या अनुषंगाने राज्याच्या महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते. विधेयकातील तरतुदींबाबत सुधारणांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने सुधारणांची शिफारस केली आहे. त्यानुसार केंद्राच्या मॉडेल अॅक्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील ज्या मोठ्या बाजार समित्यांकडे अन्य किमान २ राज्यांतून शेतमाल येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. अशा बाजार समित्या राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित केल्यानंतर या बाजार समित्यांवर शासनाचे थेट नियंत्रण होऊन निर्णय प्रक्रिया व पणन प्रक्रिया सुलभतेने व वेगाने होणार आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या सदर मॉडेल अॅक्ट २०१७ नुसार “सिंगल युनिफाइड लायसन्स” संदर्भातील तरतुदींचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांचे केडर तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जेणेकरून सचिव हा या कार्यालयाच्या थेट नियंत्रणाखाली येऊन शासन व बाजार समिती यामधील दुवा म्हणून तो काम करेल, तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांवर देखील प्रभाव नियंत्रण ठेवता येईल. यासाठी सचिवाला पर्यवेक्षणाबाबतचे कामकाज सोपविले जाणार आहे सदर सचिवांचे पगार देखरेख शुल्कामधून जमा होणाऱ्या रकमेमधून करण्यात येणार आहे. याकरिता कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणारी देखरेख शुल्काची रक्कम शासनाऐवजी पणन विभागाला सुपूर्द करावी, अशी सुधारणाही अधिनियमात करण्यात येणार आहे. या अधिनियमातील सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर सनिंयत्रण समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शेतकऱ्यांना दिलासा, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता Read More »

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार

Devendra Fadnavis: पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही न्यायालयांसाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 43 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 11 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून 4 मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी पुणे न्यायालयाचे अंतर दूर पडत असल्याने, शिवाय न्यायदान कक्षाची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणांची संख्या, निवासस्थानांची उपलब्धता विचारात घेता या नवीन न्यायालयांची स्थापन करणे गरजेचे होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयांमुळे पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

मोठी बातमी! पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार Read More »