DNA मराठी

Maharashtra Politics

img 20251006 wa0000

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे

Ahilyanagar News : स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. त्यासाठीचे नियोजन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी लेखक सचिन मोहन चोभे यांची, तर कार्याध्यक्षपदी सिद्धनाथ मेटे महाराज आणि समन्वयक पदावर लेखक रामदास कोतकर यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. याबद्दलची माहिती आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या तिसऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींनी समक्ष तर अनेकजणांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत हजेरी लावली. सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार संमेलनात महिला, नवसाहित्यिक, दिव्यांग आणि वंचित घटकांना सहभागी करून घेऊन संमेलन यशस्वी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. रमेश आमले यांनी संयोजन समितीचा ठराव मांडला. त्यास आनंदा साळवे यांनी अनुमोदन दिले. संयोजन समितीच्या सह समन्वयक पदावर कवयित्री स्वाती पाटील यांची निवड करण्यात आली. निमंत्रण समितीमध्ये शब्बीरभाई शेख, हेमलता पाटील, रमेश आमले, सुभाष सोनवणे, अमोल इथापे, शेख रज्जाक, ऋतिक लोंढे आदींची निवड करण्यात आली. तर, व्यवस्थापन समितीमध्ये संदीप गेरंगे, भानुदास कोतकर, वसंत कर्डीले, नामदेव लोंढे, प्रा. शरद दारकुंडे, ॲड. सचिन चंदनशिव, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रा. अमोल सायंबर, अजिंक्य काटकर, मेहेक वाणी, राजेंद्र खुंटाळे, देविदास बुधवंत यांनी सर्व जबाबदारी पार पाडण्याची तयारी दाखवली. संमेलनाचे प्रसिद्धीप्रमूख म्हणून ॲड. राहुल ठाणगे व मकरंद घोडके यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. लवकरच साहित्य संमेलनाची तारीख आणि संमेलनाध्यक्ष निवड करण्यात येईल अशी माहिती गवळी यांनी दिली.

Ahilyanagar News : सेनापती बापट साहित्य संमेलनाची संयोजन समिती जाहीर; अध्यक्षपदी सचिन चोभे Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »

ajit pawar

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा साताऱ्यात अचानक धावता दौरा अन् अधिकाऱ्यांना केल्या सूचना

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अचानक भेट दिली त्यांचा हा खाजगी दौरा असल्याचे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. अजित पवारांचे आगमन होताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. साताऱ्यात सर्किट हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही वेळ चर्चा करून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. दरम्यान मागील वर्षी नूतन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर त्यांना पाहणी दरम्यान पार्किंग मधील काही फरश्या फुटल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंता तात्काळ याबाबत विचारणा करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना या ठिकाणी अजित पवार बैठकीसाठी गेल्या असून कारखान्याचा आढावा आणि उसाचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने अजित दादा त्या ठिकाणी गेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रश्न विचारतच त्यांनी खासगी दौरा असल्याचा सांगत बोलण्यास नकार दिला यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी देखील चित्रीकरण करण्यास मनाई केली.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा साताऱ्यात अचानक धावता दौरा अन् अधिकाऱ्यांना केल्या सूचना Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप

Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओळखपत्रातील विसंगती 1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ • क्रमांक: DRD1360288 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 47 2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ • क्रमांक: TKM8217994 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 48 3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: SAO7387947 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 42 4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: TKM8218026 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 33 अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

ahilyanagar

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात काढण्यात आलेल्या एका रंगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत वाद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पुणे – छत्रपती संभाजीनगर हायवे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव Read More »

laxman hake

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरात हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सध्या या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात लक्ष्मण हाके सभा घेत मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे.

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला Read More »

modi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत सुमारे 1 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत. 3 संरक्षण कॉरिडॉर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात 10 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत Read More »

buldhana

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा

Buldhana News : राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यातच आता हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान “एक मराठा लाख मराठा” असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने “एक गोर, सव्वा लाखेर जोर” हे घोषवाक्य देखील पाहायला मिळालं. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा Read More »

raj thackeray

Raj Thackeray: ओला दुष्काळ जाहीर करा अन् मदत द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Raj Thackeray: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी विरोधक करत आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे… त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा. १) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल. २) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे. ३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा. ४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं. ५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच. सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं. आपला राज ठाकरे

Raj Thackeray: ओला दुष्काळ जाहीर करा अन् मदत द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »