DNA मराठी

Maharashtra crime

img 20250814 wa0010

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

crime

Jalna Crime : धक्कादायक, क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग; आरोपीला अटक

Jalna Crime: जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. तर शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.

Jalna Crime : धक्कादायक, क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग; आरोपीला अटक Read More »

img 20250723 wa0001

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार Read More »

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक Read More »

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या

Utter Pradesh Crime: आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत एका साईको किलरला अटक केली आहे. याबाबत गोरखपूर एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी माहिती दिली आहे.आरोपी घरात चोरी करून महिलांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या करत होता. परिसरात गेल्या चार महिन्यांपासून आरोपीची दहशत पसरली होती. गोरखपूरच्या झांघा पोलीस स्टेशन हद्दीतील राजधानी गावातील मंगलपूर टोला येथील राहणारा 20 वर्षीय अजय निषाद असे या सायको किलरचे नाव आहे. चार महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होती. माहितीनुसार आरोपी रात्री काळे कपडे घालून महिलांची हत्या करत होता. आरोपीने गेल्या चार महिन्यात पाच महिला व मुलींची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी रात्री 1 ते 4 च्या दरम्यान महिलांची आणि मुलींची हत्या करून चोरी करत होता. सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. या सायको किलरने 4 महिन्यांत 5 महिलांना आपला बळी बनवला आहे. एवढेच नाही तर तो इतका हिंसक आहे की अगदी पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर त्याची नजर असते. रात्री 1 ते 4 च्या दरम्यान फिरून बाहेर पडणारा हा मारेकरी महिलांची हत्या आणि अत्याचार करण्यात मजा घेतो. चोरीच्या वेळी एका मुलीचा मृत्यू झाला की, पोलिसांनी तिच्या शोधात गस्त वाढवली, पण तीही त्यांच्यापासून दूर गेली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला अटक केली आहे. असा खुलासा पोलिसांनी केला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सर्व घटनांची कबुली दिली. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो एका बलात्कार प्रकरणात तुरुंगात गेल्याचेही त्याने सांगितले. यानंतर तो जामिनावर बाहेर असताना एकतर सुरतला गेला होता. येथून परतल्यानंतर त्याने किरकोळ चोरी करण्यास सुरुवात केली. तुरुंगात गेल्यामुळे तो महिलांचा तिरस्कार करू लागला, त्यामुळे तो सायको किलर बनला अशी देखील पोलिसांनी माहिती दिली.

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या Read More »