DNA मराठी

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election Result: राज्यात काँगेस ‘रिटर्न’! महायुतीला धक्का, भाजपची वाढणार धाकधूक?

Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीने 30 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपच्या 400 पार मिशनला ब्रेक दिला आहे.  मात्र दुसरीकडे देशासह महाराष्ट्र मध्ये देखील काँग्रेसने पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत तेरा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला भाजप पेक्षा चार जागा जास्त मिळाले आहे त्यामुळे राज्य सर्वाधिक खासदार असणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे.   गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने 13 जागांवर मजल मारली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र त्यांना फक्त 17 जागा मिळाले आहे.  महाराष्ट्रात भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत, ज्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात जिंकलेल्या 23 जागांपेक्षा खूपच कमी आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाआघाडीतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 7 जागा जिंकल्या असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामतीत पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत, तर 2019 मध्ये काँग्रेसने चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली होती. शिवसेना (UBT) 9 जागा जिंकल्या आहेत आणि NCP (शरदचंद्र पवार) 8 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी तिकीट न मिळाल्याने सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले. महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अविभाजित शिवसेना एकत्र लढले आणि 41 जागा जिंकल्या. भाजपने 25 उमेदवार उभे केले, त्यापैकी 23 विजयी झाले. तर भाजपचा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली होती आणि 18 जागा जिंकल्या होत्या. तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीने 4 मतदारसंघ जिंकले होते, तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती. मुंबईबाबत बोलायचे झाले तर येथेही सत्ताधारी महायुतीला मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. फडणवीस यांनी पराभवाचे हे कारण सांगितले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर सांगितले की, निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला, त्यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबरपर्यंत होणार आहेत. त्यांनी ‘X’ वर लिहिले की, “पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू.

Lok Sabha Election Result: राज्यात काँगेस ‘रिटर्न’! महायुतीला धक्का, भाजपची वाढणार धाकधूक? Read More »

Lok Sabha Election 2024: 13 जागांवर राज्यात आज शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू, कोण मारणार बाजी?

Lok Sabha Election: आज राज्यातील 13 लोकसभा जागांवर शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे.   राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भारती पवार आणि कपिल पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. याशिवाय प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. राज्यातील 24,553 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. ज्याची सांगता संध्याकाळी 6 वाजता होईल. या कालावधीत एकूण 2.46 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 13 जागांसाठी आज मतदान होत आहे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघातील एकूण 264 उमेदवार लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. या टप्प्यात नशीब आजमावत असलेले भाजपचे प्रमुख उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भारती पवार आणि कपिल पाटील आहेत. याशिवाय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, भाजप नेते उज्ज्वल निकम, उद्धव गटचे  खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वर्षा गायकवाड हेही आज राजकीय रिंगणात आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत मुख्य लढत सत्ताधारी महायुती आघाडी आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीमध्ये आहे. महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे, तर एमव्हीएमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2024: 13 जागांवर राज्यात आज शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू, कोण मारणार बाजी? Read More »

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही

Lok Sabha Election 2024 :  तालूक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच तालूक्यात उद्योजकांचे आगमन होऊन आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. असे होत असताना नव्याने निर्माण होणारे औद्योगिक क्षेत्र आपल्याला दहशदमुक्त ठेवायचे आहे. धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती आपल्याला निर्माण करायची नाही, असे भावनीक आवाहन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.   श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला. प्रचार फेरी, व्यक्तीगत गाठीभेटी, वाडीवस्त्यावर बैठका घेवून महायुतीच्या पदाधिकांऱ्यांनी तालुका पिंजून काढला. यावेळी मंत्री विखे पाटील यांच्यासह, विक्रमसिंह पाचपूते, राजेंद्र नागवडे, विनायक देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील यांनी आपल्या संपुर्ण दौऱ्यात केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देतानाच, जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. औद्योगिक आणि तिर्थक्षेत्र विकासातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.   जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहतीसाठी महायुती सरकारने जागांची उपलब्धता करून दिली असून उद्योजक आपल्या जिल्ह्यात येण्यास उत्सूक झाले आहेत. उद्योजक आणि कामगार यांना संरक्षणाची हमी दिल्याने औद्योगिक दृष्ट्या नगर जिल्हा मुख्य व्यापारी केंद्र होईल.  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.  सुपा औद्योगिक वसाहतीबद्दल सांगताना ते म्हणाले, या वसाहतीतील उद्योजक धाक, दडपशाहीमुळे निघून गेले. औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीने हैदोस घातला होता. हे वातावरण आपल्याला श्रीगोंद्यात होऊ द्यायचे नसेल तर लोकसभा निवडणुकीत  मतदान करताना गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विकासात अडथळे निर्माण करणारे कोण आहेत? ही ओळखण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपला संघर्ष थांबलेला नाही. येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही Read More »

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील

Lok Sabha Election: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या ५ वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ५ वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या ५ वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे महायुतीच्या काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरूणांना कामासाठी बाहेर जावे लागणार नाही यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. त्यासाठी तीन एमआयडीसीची कामे तयार असून लवकरत त्या सुरू केल्या जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी बीयाण्यापासून बाजारपेढापर्यंत सेवा सुविधा निर्माण करण्यासा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान मोदींच्या हमीच्या जोरावर जिल्हा सुभलाम सुफलाम करणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Lok Sabha Election: लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे –  डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Lok Sabha Election : ‘या’ दिवशी सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज

Lok Sabha Election : अहमदनगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  नगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र, पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.  सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Lok Sabha Election : ‘या’ दिवशी सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज Read More »

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला

Lok Sabha Election 2024 : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत. कोणतेही सर्व्हे येवू द्या,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त  केला. पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्रा.विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, सोनाली चालके, बंडू रोहकले, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, रवींद्र पूजारी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुक ही देशाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे.मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यत पोहचवला.जे  प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जावून सांगत आहोत.इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोव्हीड संकटात डॉक्टर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली.पण समोर रूग्ण मरणांशी झुंज देत असताना त्याच्यावर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही आणि होणारही नाही असे सांगून डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही.विखे पाटील परीवार लोकंमध्ये जावून काम करतो.या जिल्ह्यातील लोकांच्या सुख दुखात सहभागी होवून लोकांचे पाठबळ मिळवतो.प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला राजकारणात अनेक वर्ष संधी मिळाली.त्यामुळे आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे.कोणाचेही सर्वे येवू द्यात अहिल्यानगर मतदार संघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा.सुजय विखे पाटील यांनी केला. खोट्या सहानुभूतीला यापुर्वी  पारनेर तालुका फसला.आता पुन्हा ती चूक या तालुक्यातील जनता करणार नाही असा विश्वास व्यक्त करून या तालुक्यातील जनतेने आता विकास कामाची तुलना करण्याची गरज आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.काम कमी आणि व्हिडीओच  जास्त आशी परिस्थिती तालुक्याची असल्याचा टोला लगावून पारनेर हा विचरांचा तालुका आहे. जनता सूज्ञ आहे.एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य घडवविणारी आहे.तशीच पारनेर तालुक्याच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे.या भागातील युवकांचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे.समृध्द सुशिक्षित आणि सुरक्षित पारनेर करीता आपल्या सर्वाच्या सहकार्याने काम करायचे असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला Read More »

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे

Ahmednagar Lok Sabha Election:  कोव्हीड संकटात सर्व उपाय योजना आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका डॉक्टर या नात्याने खा.सुजय विखे पाटील यांनी घेतली.कुठेही स्टंटबाजी न करता त्यांनी जपलेल्या  सामाजिक बांधिलकीला जनता भक्कमपणे साथ देईल असा विश्वास  डॉ मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केला. खा डॉ सुजय विखे यांची उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना पुन्हा उमेदावारी देण्यात आल्याने या मतदार संघातील जनता खा.विखे यांना समर्थन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयात स्वतंत्र कोव्हीड सेंटर सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करून दिली.रूग्णांना प्राणवायू उपलब्ध होत नव्हता आशा काळात स्वतंत्र असा आॅक्सिजन प्रकल्प सुरू केला.रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता  प्रत्येक रुग्णाला करून दिली.यामध्ये त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्यचा प्रयत्न झाला.पण थोडेही विचलित न होता खा.डॉ विखे पाटील कोव्हीड योध्दा म्हणून काम करीत राहीले. कोव्हीड कालावधीत इतर सर्व रुग्णालय बंद असताना खा.डॉ विखे यांनी विखे पाटील रूग्णालयात सुमारे सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती मोफत करून देत सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली. सिंधू अन्नछत्र मोफत किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप केले. जिल्ह्यातील २७०शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारात रोजगार आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कुटूबियांची मोठी समस्या दूर करण्यात खा.विखे यांनी घेतलेली भूमिका सर्वाच्या दृष्टिने अभिमानास्पद राहील्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  यांनी सांगितले कोव्हीड संकटात केंद्र सरकारने खासदारांना मिळणारा सर्व निधी कोव्हीड फंडासाठी वापरण्यात आला. परंतू निधी नाही म्हणून कोणतेही कारण न सांगता खा.विखे अविरतपणे कोव्हीड संकटात मतदार संघातील जनतेच्या पाठीशी कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले हे महत्वपूर्ण आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.परंतू कोव्हीड संकटातील उपाय योजना होवू शकल्या नव्हत्या.पण खा.विखे यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेधी होते.कुठेही प्रसिध्दीचा डामडौल आणि स्टंट बाजी न करता डॉक्टर या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिकाच लोकांना भावली असल्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  म्हणाले. विखे पाटील परीवाराच्या सामाजिक बांधिलकीची मोठी परंपरा असून तीन पिढ्यांचा वारसा खा.डॉ सुजय विखे पुढे घेवून जात आहेत.राजकारणाच्या पलीकडे जावून विखे पाटील परीवार कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची घेत असलेल्या  भूमिकेला जनता चांगले पाठबळ देईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे Read More »

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील

Lok Sabha Election:  राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात खा.विखे पाटील बोलत होते.  अहिल्यानगर मधील लोकसभेच्या प्रचाराला आता रंग चढत चालला आहे. “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाच्या माध्‍यमातून त्‍यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते   आणि बुथ प्रमुखांशी त्‍यांनी संवाद साथला. याप्रसंगी आ.मोनीकाताई राजळे यांच्‍यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात केवळ महायुतीच्याच उमेदवाराला लोकांची पसंती मिळणार असून राज्यात ४५ हुन अधिक जागेवर मोठ्या मताधिक्याने कार्यक्रत्यांच्या जोरावर आपले उमेदवार निवडून येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि कतृत्‍ववान पंतप्रधान मिळणार आहे. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.  डॉ.सुजय विखे म्हणाले महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही. आणि त्यांच्यातील वादच हे त्यांच्या नष्ट होण्याचे कारण असणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ४ जूनला राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडी आघाडीचा जनता दारुण पराभव करेल.  कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता केवळ देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्‍यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.

Lok Sabha Election: सामान्‍य माणसाचे पाठबळ मोदीजींच्‍या पाठीशीच – खा.डॉ.सुजय विखे पाटील Read More »

Lok Sabha Election : रोजगाराच्या संधी जिल्ह्यात निर्माण करणार : खा. विखे पाटील

Lok Sabha Election: राज्‍याच्‍या राजकारणात महत्वाची भुमिका बजाविणारा जिल्हा म्हणुन अहमदनगरकडे पाहिले जाते. जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुशंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्‍हा बॅकेचे अध्‍यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्‍यात खा.विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सध्या तरुणांसाठी जिल्ह्याला सर्वात मोठी समस्या रोजगारासाठी बाहेर जावे लागणे ही आहे. यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेऊन मी पहिली निवडणुक लढविली होती. पण कोरोना काळ आणि हप्ता वसूली सरकार असल्याने फारसे प्रयत्न करता आले नाहीत. मात्र मागील दोन वर्षाच्या काळात महायुतीचे सरकार आल्याने जिल्ह्यात औद्योगिक वसाहती उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. वडगाव गुप्‍ता व शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी मिळाल्‍याने  तरुणांना रोजगार मिळणार आहे. श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी येथे शासनाची ६१८ एकर जमीन विनामुल्य मिळवत औद्योगिक वसाहतीचा पाया रचला असून, लवकरच त्यांचे काम सुरू होईल. यामुळे जिह्यात अधिक रोजगार निर्मीती होऊन हजारो तरूणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांना जिल्ह्यातच राहता येणार आहे. स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्याने तरुणांचे मनोबल वाढणार आहे. याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होणार असल्याचे मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.  उद्योग धद्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो रुपायाचा निधी मिळवत गावा गावातील रस्ते, महामार्ग, अशी दळण वळणाची साधने उभी केली. एन.एच.आय तर्फे ४ हजार २७७.५० कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्यात सुसज्य, जलद अशा रस्त्यांची निर्मीती केली. १४५४ कोटी रुपयांचा निधी मिळवत सहा राष्ट्रीय महामार्गाचा विकास केला. तर गावागावात वाहतुकीच्या सुविधा पोहचाव्यात यासाठी १३६.१३ कोटी रुपयांचा निधी मिळवत २९ गावांत रस्त्यांचे जाळे उभे केले. दळणवळणाची साधने वाढल्याने उद्योजकांसाठी अहमदनगर हे मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे जिल्ह्यात येणार असून स्थानिकांचा रोजगाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Lok Sabha Election : रोजगाराच्या संधी जिल्ह्यात निर्माण करणार : खा. विखे पाटील Read More »

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा करत महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यामुळे महायुतीमध्ये जाण्याबाबतची बोलणी फिसकटली असं म्हणाले होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये प्रवेश भाजपमुळे नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला नाही.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी असा प्रस्ताव राज ठाकरे यांना दिला होता. मात्र राज ठाकरे आपला चिन्ह इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या भाषणाबाबत उल्लेख देखील केला होता. सूत्रांनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत ताज लँड्समधील बैठकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता.  तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत यापूर्वी स्पष्टीकरण देत सांगितले होते की, भाजपकडून राज ठाकरे यांना त्यांच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नव्हता.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला.

Raj Thackeray : … म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश टाळला, ‘हे’ आहे कारण Read More »