Lok Sabha Election: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या ५ वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ५ वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या ५ वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे महायुतीच्या काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरूणांना कामासाठी बाहेर जावे लागणार नाही यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. त्यासाठी तीन एमआयडीसीची कामे तयार असून लवकरत त्या सुरू केल्या जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी बीयाण्यापासून बाजारपेढापर्यंत सेवा सुविधा निर्माण करण्यासा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान मोदींच्या हमीच्या जोरावर जिल्हा सुभलाम सुफलाम करणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.