DNA मराठी

Leopard

prajakt tanpure

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र

Prajakt Tanpure :  नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्या पासून पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमावे लागले आहे आता याच धर्तीवर ती राहुरी मध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला असून शेतकरी व नागरिकांनी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्यांची पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर हा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांना बळी गेला आहे प्रशासनाकडून केवळ नुकसान भरपाई दिली जात असली मात्र नागरिकांचा बळी जात असल्याने आता असंतोषाची भावना तयार होत आहे. राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर शेतकरी हे एकवटले व केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा तातडीने बदल करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तब्बल 20000 शेतकऱ्यांच्या सह्या करण्यात आलेली पत्र थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे कुत्रंप्रमाणे बिबटेही रस्त्यावर फिरतील बिबट्यांची वाढती संख्या पाहता ज्याप्रमाणे रस्त्यावरती कुत्रे फिरत आहेत तर येणाऱ्या काळात बिबटे ही तसेच रस्त्यावर फिरतील सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व बिबट्यांबाबत ठोस कारवाई कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुरीचे माजी आमदार तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला आहे. बिबट्याला घेऊन आंदोलन बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची जीवन अत्यंत धोक्यात आले असून या व्यथा मांडण्यासाठी राहुरी मध्ये आंदोलन पुकारण्यात आले यावेळी बिबट्याची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांना घेऊन शहरातून मिरवणूक काढण्यात आली दरम्यान हा केवळ प्रतीकात्मक बिबट्या आहे उद्या खराब बिबट्या घराशीला तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित शेतकऱ्यांनी केला यामुळे केंद्राने यावरती तातडीने निर्णय घ्यावा यासाठी थेट मोदींना पत्र पाठवण्यात आलेली आहे यावर आता काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Prajakt Tanpure : नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला; प्राजक्त तनपुरे आक्रमक, थेट मोदींना पाठवले 20 हजार पत्र Read More »

leopard

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

Leopard in Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे. आता तर बिबट्या थेट मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे नगर शहराजवळ असलेले भिंगार शहर परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाने अखेर त्याला पकडले आहे. अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच मनुष्यवस्ती मध्ये येत बिबट्याने अनेकांवर हल्ले केले असून यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरी वस्ती मध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भिंगार शहरातील वारूळ वाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोन द्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद Read More »

sangli

Sangali News :  बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्या वापरून सांगलीत अनोखं ‘जुगाड’

Sangali News  : सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मात्र, वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी शक्कल लढवली आहे. शेतात बिबट्या येऊ नये म्हणून त्यांनी चक्क बियरच्या रिकाम्या बाटल्या आणि नट-बोल्टचा वापर करून एक ‘ध्वनी यंत्र’ तयार केले आहे. त्यांच्या या अनोख्या जुगाडाची सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती. वनविभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते.असे तयार केले ‘स्वदेशी अलार्म’ बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आवाजाला घाबरतात, हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढवली त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बियरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या.त्या बाटल्यांच्या आत नट-बोल्ट आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकवले की वाऱ्याच्या मंद झुळुकीनेही त्यातून ‘खुळखुळ’ असा आवाज येतो. काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो. या प्रयोगाचा फायदा असा झाला की, रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो. परिणामी, बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे. अत्यंत कमी खर्चात आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे सुरक्षा यंत्र कुरळपमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं, याचं उत्तम उदाहरण चव्हाण यांनी घालून दिलं आहे.

Sangali News :  बिबट्याला रोखण्यासाठी बियरच्या बाटल्या वापरून सांगलीत अनोखं ‘जुगाड’ Read More »

leopard

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्याचा वावर असून सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या वेळी शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना शेतकरी आणि मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा मुलांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला सोडले जाते. अशा वेळी मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन एखाद्या मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येईल. फार वाकून ऊसतोड करू नये; कारण अशा वेळी दुसरा एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डर किंवा वायरलेस ब्लूटूथ स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात गाणी लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोड किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समूहाने काम करावे. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळवण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : जिल्ह्यात विविध भागांत बिबट्याचा वावर…प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाची सुचना Read More »