DNA मराठी

latest news

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.  भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी  हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.  तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक

Married Tips : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यातच जर तुमच्या बहीणीचे अथवा एखाद्या बेस्ट फ्रेंडचं लग्न ठरलं असेल तर या काळात तुम्हाला लग्नाची मौजमजा लुटण्याती संधी नक्कीच मिळेल.  अशा वेळी एखाद्या खास लग्नासाठी तयार होताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नाहीतर तुमचा पूर्ण लुकच खराब होऊ शकतो. कारण बऱ्याचदा लग्नकार्यात फॅशनबाबत केलेल्या या चुका महागात पडतात. यासाठी जाणून घ्या लग्नकार्यासाठी तयार होताना आमंत्रितांनी कोणत्या चुका करू नयेत. पांढरे अथवा काळे कपडे घालणे  बऱ्याच लोकांना पांढरा आणि काळा रंग खूप आवडत असतो. त्यामुळे कुठेही जाताना ते याच रंगाचे कपडे निवडतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाणार असता तेव्हा पांढरा अथवा काळा रंगाचे कपडे मुळीच परिधान करू नये. कारण लग्नकार्यात पांढरा आणि काळा रंग शोभून दिसत नाही.  काळा रंग शुभ कार्यासाठी वर्ज्य असल्यामुळे तो वापरू नये आणि पांढरा रंग हा खूपच फिकट असतो त्यामध्ये तुमचे फोटो चांगले येत नाहीत. यासाठी लग्नकार्यात जाताना लाल, पिवळा, हिरवा असे पारंपरिक आणि गडद रंग निवडा. एकाच रंगाचा पूर्ण आऊटफिट वापरणे  जर तुम्हाला लग्नात उठून दिसायचं असेल तर एकाच रंगसंगतीचा आऊटफिट वापरू नका. तुमच्या ड्रेस अथवा साडीमध्ये कॉम्बिनेशन असायला हवं. कारण  त्यामुळे तुमचा आऊटफिट उठावदार दिसतो. रंगसंगती ही कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या आऊटफिटचे रंग जाणिवपूर्वक निवडा. एकाच रंगाचा पूर्ण सूट वापरल्यामुळे तुमच्या उंची आणि व्यक्तिमत्वामध्ये उठावदारपणा दिसत नाही. यासाठीच वेडिंग आऊटफिट निरनिराळ्या रंगाच्या रंगसंगतीत तयार केले जातात.  डेनिमचे आऊटफिट घालणे  काही  लोकांचे डेनिमवर विशेष प्रेम असतं. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात त्यांना डेनिम लुक करणं आवडू शकतं. मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला जीन्स अथवा डेनिम आऊटफिट्स कितीही आरामदायक वाटत असले तरी ते लग्नकार्यात वापरू नयेत. कारण वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही गडद रंगाचे, एथनिक लुक असलेले कपडे घातले तर ते नक्कीच शोभून दिसतं. त्यामुळे लग्नकार्यात कपडे आरामदायक असण्यासोबत शोभून दिसतील असेच निवडावे. हेव्ही गोल्ड ज्वैलरी वापरणे  लग्नकार्य म्हटलं की दागदागिन्यांची हौस ही आलीच. मैत्रीण अथवा बहीणीच्या लग्नात तुम्ही साडी, लेंगा वापरणार असाल तर दागदागिने त्यावर सूट होतील असेच निवडा. सोन्याची ज्वैलरी कितीही मौल्यवान असली तरी ती प्रत्येक आऊटफिटवर चांगली दिसेल असं नाही. त्यामुळे तुमचे आऊटफिट कसे आहेत त्यानुसार तुमची ज्वैलरी निवडा. शिवाय जर गळ्यात हेव्ही नेकलेस असेल तर इतर ज्वैलरी कमी घाला ज्यामुळे तो नेकपीस उठून दिसू शकेल.  अती सैल अथवा अती घट्ट कपडे  कोणत्याही लग्नासाठी तयार होताना आधी तुम्ही कपडे तुमच्या फिटिंगचे आहेत का याची ट्रायल घ्यायला हवी. कारण तुमचे वजन नेहमी कमी जास्त होत असते. अशा वेळी त्यानुसार साडीवरचे ब्लाऊज अथवा लेंग्याचं फिटिंग कमी जास्त करणं गरजेचं आहे. लग्नात अती ढगळ अथवा अती घट्ट कपडे घातल्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो.

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक Read More »

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ

Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु  हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद  बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह  शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.  या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ Read More »

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई

Ramadan Eid 2024 – केडगाव नगर पुणे रोडवरील   शाही जामा मशिदीस रमजाननिमित्त सालाबाद प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारतासह जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात चंद्र दर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्त ठिकठिकाणी मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.  याही वर्षी चंद्र दर्शन झाल्यानंतर 11 एप्रिल किंवा 12 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी  होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील  शाही जामा मशीदवर आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली आहे.   मशिदीचे अध्यक्ष जनाब हाजी अकबर पठाण, हाजी उस्मान मणियार ,रफिक भाई शेख ,मुन्नवर सय्यद, नदीमरजा शेख ,साहिल पठाण, नजीर पिरजादे, या बांधवांनी सर्व धर्मीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रत्येक समाजात जात धर्म पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता ही असते ती जागृत करण्याचे काम आपण केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई Read More »

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित

NCP News :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.   लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित Read More »

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू….

Mumbai News : मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी  होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र, चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. सोमवारी 20 ते 21 वर्षे वयोगटातील पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.  काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही. बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (19) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू…. Read More »

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित “मिशन आरंभ २०२४” उपक्रमांतर्गत दि. १० मार्च रोजी आयोजित केलेल्या इयत्ता-चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि. २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धात्मक स्वरूपाच्या अभ्यासाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी प्राथमिक स्तरापासूनच सुरू करावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव येथील श्रीपद्म प्रविण शिंदे ( इयत्ता चौथी ) याने या परीक्षेत ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून त्याने तालुकास्तरावर आठवा तर बालमटाकळी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.  त्याचबरोबर अमृता पांडुरंग पाटील, श्रावणी जगदीश तहकीक, साईराज प्रभाकर तहकीक, स्वरा वैजिनाथ नागरे, शिवराज बाळासाहेब तहकीक, शिवानी राजेंद्र जाधव अशी एकूण सात विद्यार्थी संबंधित परीक्षेत पात्र ठरले आहेत. मुलांच्या गुणवत्ता विकासात शाळेचे आदर्श वर्ग शिक्षक प्रविण शंकर शिंदे त्याचप्रमाणे सहकारी आदर्श शिक्षिका श्रीमती राजगुरू भारती भाऊसाहेब, श्रीमती तनपुरे संतोषी शामराव व श्रीमती गर्जे मंगल देवराव यांचे मोलाचे असे मार्गदर्शन व योगदान लाभले.  शालेय भौतिक विकास त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता विकास कामी शेवगावचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर, केंद्रप्रमुख काळु भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..! Read More »

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक

Maharashtra News : राज्याच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सायंकाळी 5 वाजता जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (26 मार्च) उद्धव गटाच्या 15 किंवा 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्याआधी या बैठकीत ज्या जागांवर दोन गटात वाद आहे, त्यावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे 2014 आणि 2019 ची परिस्थिती आता राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाला काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने जास्त जागांची अपेक्षा करू नये. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सेना अतिआत्मविश्वासात आहे. ठाकरे आणि पवार यांनी युतीकडे अधिक जागांची मागणी केली असली तरी बुलढाणा आणि वर्धासारख्या जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेची कट्टर हिंदू व्होट बँक (यूबीटी) त्यांच्याकडे जाईल की नाही, अशी काँग्रेसला चिंता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक Read More »

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे

Ahmednagar News:  लोकनेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.  पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.  यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे Read More »