DNA मराठी

Kunal bhandari

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा

Ahmednagar News: येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होणार आहे, मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये झालेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी केली आहे.   उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत बांधकाम व्यवसायिकांनी त्यावरती बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने अनेकांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून पाणी घुसण्याचे प्रकार समोर येत आहे. यामुळे यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच ठिकाणचे पथदिवे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्‌डे झाले आहे.  खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने खड्‌ड्यात जाऊन पाणी उडल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाह होतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या साचलेल्या पाण्यांमध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे डेंगु, मलेरिआ चिकन गुणिया सारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे.  तसेच शहरातील प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व मोबाईल नंबरची माहिती वृत्तपत्रातुन प्रसिध्द करावी आणि पावसाळ्यापुर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदना मार्फत देण्यात आला आहे.

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा Read More »

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी 

Ahmednagar News : 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.  त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी भागात अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटूंबातील 6 वर्षाच्या लहान मुलीवर निर्दयीपणे एका सराईत आरोपीने लैंगिक अत्याचार केला.  त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा.  तसेच सदर पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि शासनाच्या वतीने मुलीच्या पुनर्वसनासाठी व तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी  Read More »

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झालेली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आता कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मुंबई येथे बागेश्वर धामचे महंत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री कुणाल भंडारी यांची बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी बढती केली आहे.  सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा यावेळी प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी व्यक्त केली.

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड Read More »