DNA मराठी

IPL 2024

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट?

IPL 2024 : नेहमी सोशल मीडियावर चर्चित राहणारा भारतीय संघाच्या स्टार खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तो यावेळी IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता मात्र यावेळी आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबईचा संघ पहिला संघ ठरला होता. तर आता हार्दिक वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत, ज्याचे संकेत नताशानेच दिले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध चांगले चालले नाहीत आणि हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. Reddit वर मंगळवारी कोणीतरी एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे होत आहेत असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, हार्दिक आणि नताशाच्या वेगळ्या होण्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नताशाने असे संकेत दिले सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून हार्दिक पांड्याचे आडनाव हटवले आहे. नताशा आधी पांड्या हे आडनाव वापरायची, पण तिने आता ते काढून टाकले आहे. याशिवाय तिने हार्दिकसोबतचे अनेक फोटोही डिलीट केले असून अनेक दिवसांपासून तिने एकमेकांसोबतचे फोटोही पोस्ट केलेले नाहीत. एवढेच नाही तर हार्दिकने नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस आहे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 31 मे 2020 रोजी एकमेकांशी लग्न केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले असले तरी. वास्तविक, लग्नाच्या काही महिन्यांनंतर 31 जुलै रोजी नताशा आणि हार्दिक आई-वडील झाले. नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. हार्दिक आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट? Read More »

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

KKR vs SRH Match Highlights : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या हैदराबादचा संघ 19.3 षटकात 159 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने केवळ 13.4 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेटने जिंकला. कोलकाताने आयपीएल 2024 फायनलसाठी तिकीटही बुक केले आहेत. तर हैदराबादला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.  कोलकाताने 160 धावांचे लक्ष्य गाठले  कोलकाता नाईट रायडर्ससमोर 160 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 13.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये 97 धावांची नाबाद भागीदारीही झाली.  रहमानउल्ला गुरबाज 23 तर सुनील नारायणला 21 धावा करता आल्या. दोघांनीही डावाची सुरुवात वेगवान केली होती, जी व्यंकटेश आणि श्रेयसने पूर्ण केली. या विजयासह कोलकाता संघाने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत केकेआरचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण हैदराबाद अजूनही फायनलमध्ये येऊ शकते, तर राजस्थान आणि बेंगळुरूही या शर्यतीत आहेत.  KKR विरुद्ध SRH यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 बळी घेतला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि पॅट कमिन्सने 1-1 विकेट घेतली.  सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा फारसा फायदा संघाला घेता आला नाही. संघ 19.3 षटकात केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 3, नितीश रेड्डी 9, शाहबाज अहमद 0, हेनरिक क्लासेन 32, अब्दुल समद 16, सनवीर सिंग 0, पॅट कमिन्स 30, भुवनेश्वर कुमार 0 आणि विजयकांत व्यासकांतने नाबाद 7 धावा केल्या.

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव Read More »

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार?

RCB vs CSK : आज IPL 2024 RCB आणि CSK दरम्यान भिंडत होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्या अगोदर बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.    प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आयपीएल 2024 च्या प्लेऑफचा चौथा संघ या सामन्याद्वारे निश्चित होणार आहे. सध्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आज चौथ्या क्रमांकाच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे, त्यामुळे हा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. असे झाल्यास, कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल ते जाणुन घ्या. IMD ने 18 ते 20 मे दरम्यान बेंगळुरूमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज पावसामुळे सामना अनेक वेळा खंडित होऊ शकतो. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था इतर सर्व स्टेडियमपेक्षा चांगली असली, तरी मुसळधार पाऊस पडल्यास सामन्याची मजाच विस्कळीत होईल. आता प्रश्न असा आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला तर चेन्नई सुपर किंग्ज सहज प्लेऑफसाठी पात्र ठरेल. कारण IPL 2024 च्या गुणतालिकेत, CSK 13 पैकी 7 सामने जिंकून आणि +0.528 च्या रननेटने 14 गुणांसह अजूनही चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल जर आपण RCB बद्दल बोललो तर 13 सामन्यांमध्ये त्याचे 12 गुण आहेत, त्यामुळे आज RCB विरुद्ध CSK सामना त्यांच्यासाठी नॉकआउट सामना असेल. या शेवटच्या सामन्यात, जर आरसीबी 18 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने जिंकला किंवा 18.1 षटकात धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाला तर त्याला प्लेऑफचे तिकीट मिळेल.

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार? Read More »

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत

MS Dhoni : आयपीएल 2024 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभव केला मात्र भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा  यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने एक मोठी कामगिरी केली.  या सामन्यात पृथ्वी शॉचा झेल घेत त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील 300 बाद पूर्ण केले. या सामन्यात पृथ्वी शॉने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. शॉचा चेंडू रवींद्र जडेजावर कट करण्याच्या प्रयत्नात असताना धोनीने विकेटच्या मागे झेल घेतला आणि धोनीने नवा विक्रम रचला.  चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी यंदाच्या मोसमात फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. धोनीने आतापर्यंत 213 झेल आणि 87 स्टंपिंग केली आहे. धोनीने आज T20 मध्ये 300 बाद पूर्ण केले असतील पण तो दीर्घकाळ T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करणारा खेळाडू होता. धोनीच्या मागे पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आहे, ज्याने 264 बाद घेतले आहेत.  भारताच्या दिनेश कार्तिकने 274 ची शिकार केली आहे. क्विंटन डी कॉकच्या नावावर 270 विकेट आहेत आणि जोस बटलरच्या नावावर 209 विकेट आहेत.

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »

IPL 2024:  बापरे! एक दशकानंतर IPL मध्ये परतणार ‘हा’ दिग्गज, लिलावामध्ये होणार मालामाल

IPL 2024: येत्या काही दिवसात  आयपीएल 2024 साठी लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत 333 व्यक्तींचा समावेश आहे, एक खेळाडू 9 वर्षांच्या अंतरानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे IPL 2024 च्या लिलाव यादीतील एक उल्लेखनीय नाव आहे ज्याची मूळ किंमत 2 कोटी आहे. स्टार्क शेवटचा आयपीएल 2015 मध्ये खेळला होता आणि आता जवळपास एक दशकानंतर लीगमध्ये पुनरागमन करत आहे. स्टार्कचा आयपीएल प्रवास रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघापासून सुरू झाला, जिथे तो दोन हंगाम खेळला. 2014 च्या मोसमात, तो 14 विकेट्स घेऊन RCBसाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला. त्याचा प्रभाव 2015 च्या हंगामातही कायम राहिला, जिथे तो 20 विकेट्ससह युझवेंद्र चहलच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला. आयपीएलमध्ये तुलनेने लहान असतानाही, स्टार्कने त्याच्या गोलंदाजीच्या क्षमतेने कायमची छाप सोडली. आयपीएल 2018 लिलावात, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही स्पर्धात्मक बोलीमध्ये सहभागी झाल्याने स्टार्कने लक्ष वेधले. अखेरीस, कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कला 9.4 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. दुर्दैवाने दुखापतीमुळे स्टार्कला मोसमातून माघार घ्यावी लागली. आता, स्टार्क आयपीएल 2024 लिलावात सामील झाल्यामुळे, कोणता संघ त्याला खरेदी करणार हे पाहावे लागणार. 

IPL 2024:  बापरे! एक दशकानंतर IPL मध्ये परतणार ‘हा’ दिग्गज, लिलावामध्ये होणार मालामाल Read More »