DNA मराठी

IMD rain alert

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट

Maharashtra Rain Alert: 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. 1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे. 22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही. अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: जिल्ह्यात 28 मेपर्यंत वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा Read More »

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसरधार पावसाने हजेरी लावली. रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले ज्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक त्यांच्या घरात अडकले आहेत आणि प्रशासन मदत कार्यात व्यस्त आहे. बारामतीत 150 घरांमध्ये पाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मते, इंदापूरमधील सुमारे 70 वस्त्यांमध्ये आणि बारामतीतील सुमारे 150 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बारामतीमध्ये 19 घरांचे अंशतः नुकसान झाले. घरात पाणी साचल्याने एकाच कुटुंबातील सात जण अडकले.

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा

IMD Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून जवळ्पास संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता पुढील काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र कोकणाजवळ सक्रिय असल्याने 23 मे रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर मधील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. याच बरोबर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा Read More »

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का?

Jayant Patil: राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? शेतकऱ्यांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत होता. राज्यभर दिसणारे हे चित्र केविलवाणे आहे असे म्हणाले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं या वेदना सरकारला कळतील का? Read More »

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा

IMD Rain Alert: जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरवर जवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लांबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. गारपीटीदरम्यान मोकळ्या जागी आल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू किंवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यापासून शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असेल किंवा तसे नियोजन केले असल्यास शेतीमालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. स्वतःचे व जनावरांचे संरक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी कळविले आहे.

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा Read More »

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत वेळेपूर्वी दाखल झाला असून, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.  कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी मुसळधार पाऊस पडू शकतो. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 11 जूनपर्यंत कोकणात अतिवृष्टी (64.5-115.5 मिमी) ते अति अतिवृष्टी (115.5-204.4 मिमी) होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे. येथे हवामान कसे असेल? IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.   सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो. इथे मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »