DNA मराठी

health tips

Detox Tea : ‘या’ चहाच्या मदतीने किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करा

Detox Tea : निरोगी राहण्यासाठी शरीर आतून स्वच्छ आणि बळकट असणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाने शरीर स्वच्छ राखण्यास मदत होते. मूत्रपिंडाची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डिटॉक्स करणं आपली जबाबदारी आहे. या लेखात आम्ही आपल्याला सांगणार आहोत हर्बल चहाबद्दल ज्याचा नियमित सेवनाने आपण आपल्या यकृत आणि मूत्रपिंडाला डिटॉक्स करू शकता. मूत्रपिंड आणि यकृताला डिटॉक्स करण्यासाठी चहा  जास्वंदाचा चहा जास्वंदाचा चहा आपल्या यकृताला निरोगी आणि सुरक्षित ठेवून अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करतं. याचे नियमाने सेवन केल्याने यकृताच्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. दालचिनीचा चहा दालचिनीचा चहा मूत्रपिंड आणि यकृताला स्वच्छ म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. याने आपण आपल्या सकाळची सुरुवात करू शकतात. बीटाचा चहा बीटाचा चहा एक चांगला मूत्रपिंड क्लींजर आहे आणि हे आपल्या यकृताच्या आरोग्याला सुधारतो. बीटाचा रस अँटीऑक्सीडेंटने समृद्ध असतं. जे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतो. हा मूतखडा सारख्या आजारावर फायदेशीर आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध असलेल्या हळदीचे सेवन केवळ मूत्रपिंडांना डिटॉक्स करण्यातच मदत करीत नाही तर या मुळे सूज येणं देखील कमी होते. हळद रक्तदाब कमी करते, जे मूत्रपिंडाच्या आजाराचे मुख्य कारण आहे. इतकेच नव्हे तर हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. परंतु उन्हाळ्यात हळदीचा चहा शरीरात जास्त उष्णता वाढवू शकतो, म्हणून उन्हाळ्यात याचे सेवन न करणेच योग्य मानले जाते.

Detox Tea : ‘या’ चहाच्या मदतीने किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करा Read More »

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर ….

Biscuits Side Effects : डायजेस्टिव बिस्टिकटच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त कळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात.  यापासून बचाव करण्यासाठी डायजेस्टिव बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणा-या बिस्किटामध्ये खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाइंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकलयुक्त टेस्ट इनहेंसर देखील वापरलं जातं. यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? डायजेस्टिव बिस्किट खरं तर डॉक्टर्सच्या सल्ल्यावरून जुलाब  व खराब डायजेशनमधून जाणा-या रुग्णांसाठी बनवली गेली आहेत.  बाजारात मिळणा-या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव बिस्किटात फायबरयुक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.  ही बिस्किटं मधुमेहांच्या  रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं. ग्लुटेनची मात्रा करू शकते घात बेकरी आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रॅंडच्या डायजेस्टिव बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते.  जर तुम्हाला ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असेल तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान डायजेस्टिव बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं. पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जरी ही बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादीत प्रमाणात सेवन करणे कधीही उत्तम. प्रिजरव्हेटिव्हसचा भडिमार बाजारात डायजेस्टिव बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यामध्ये प्रिजरव्हेटिव्हस मिसळले जातात. जेणे करून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेंस टाकणंही मजबूरी असते.  आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिजरव्हेटिव्हसच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असते. हे प्रिजरव्हेटिव्हस व इसेंस शेवटी केमिकलच आहेत. शुगरलेस नाही डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ ही बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किटं खालल्याने तुम्ही नकळतच एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे जर यातील साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा, ह्रदयाशी निगडीत आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही. सोडियममुळे होऊ शकतात समस्या बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राऊट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करावा.  यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकोनट बिस्किटं किंवा असे पदार्थच खा जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, अ‍ॅलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल.

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर …. Read More »

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

Clove Tea : दिवसाची सुरुवात असो किंवा कोणतंही शारीरिक, मानसिक काम केल्यानंतर आलेला थकवा असो एक कप कडकडीत चहा प्यायला की सगळी मरळ दूर होते आणि  मस्त तरतरी येते. त्यामुळे चहा हे अनेकांच्या आवडतं पेय आहे.  पूर्वी चहा हा अत्यंत साध्या पद्धतीने केला जात होता. मात्र, आता या चहामध्ये सुद्धा नवनवीन फ्लेवर मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे गृहिणी साधाच चहा हटके पद्धतीने तयार करत त्याला एक नवीन चव देतात. त्यामुळेच साध्या चहापेक्षा मसाला चहा, आल्याचा चहा, गवतीचहा, ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक चहा लोकप्रिय होत आहे.  परंतु यासोबतच लवंगांचा चहा सुद्धा सध्या लोकप्रिय होत असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लवंगांचा चहा कसा करायाच आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात. 1. श्रमाची काम केल्यामुळे किंवा आजारपणामुळे अंग दुखत असल्यास लवंगांच्या चहामुळे थकवा दूर होतो व आराम मिळतो. 2. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दूर होतो व अन्नपचन व्यवस्थित होते. 3. दातदुखी दूर होते. 4. किरकोळ ताप येत असेल तर लवंगांचा चहा प्यावा. 5. सर्दी-खोकला दूर होतो. 6.डोकेदुखीपासून आराम मिळतो.  लवंगांचा चहा कसा कराल? 4-5 लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा. त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात 1 लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका. लवंगांची पूड टाकलेलं पाणी 10 मिनीटं उकळवा व पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार. ( आवड असल्यास साखर घालावी.)

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे Read More »

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Health Tips: आज अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी या बिझी लाईफस्टाईल मध्ये रोज सकाळी किंवा रात्री अंडी खातात मात्र आपल्याला हे माहित आहे का ? फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात.    संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे. फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे   फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात.  अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.  बॅक्टेरियांचा धोका अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तापमान  जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो. तुटण्याची भीती  बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या Read More »

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Tips: कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठून कोमट पिण्याचा सल्ला तर आपण अनेकांकडून ऐकला असेलच.  कोमट पाण्यात सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची क्षमता असते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायद्याचे आहे. झोपताना अनेक लोक पाणी पिणे टाळतात परंतू कोमट पाणी पिण्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि शांत झोप देखील लागते. योग्य रित्या होईल पचन कोमट पाणी पचन तंत्रात अवांछित अन्नाला योग्य पचन दिशेत घेऊन जाण्यात मदत करतं. रात्री आपले पचन तंत्र सर्वात कमजोर अवस्थेत असतं अशात कोमट पाणी पिण्याने अन्न लवकर पचण्यात मदत मिळते. वजन कमी होण्यास मदत मिळेल आमचे पचन तंत्र रात्री मजबूत अवस्थेत नसतं. अशात कोमट पाण्यामुळे आहार लवकर पचवण्यात मदत मिळतं. ज्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. काळजी आणि उदासीनता दूर होईल शरीरात पाण्याची कमी ताण निर्माण होतं. यामुळे झोप देखील प्रभावित होते. दिवसाच्या शेवटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरात जल स्तराचे प्रमाण योग्य राहील आणि आपली मन देखील प्रसन्न राहील. विषारी पदार्थांपासून मुक्ती कोमट पाणी शरीराचे आंतरिक तापमान वाढवतं आणि घाम निर्माण करतं ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहतं आणि शरीराला विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळते. सौंदर्यात वाढ झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचेचं सौंदर्य वाढतं.

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे Read More »

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा

Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल. टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.  या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार. टायफाइडची लक्षणे  ताप येतो भूक लागत नाही डोकं दुखणं थंडी जाणवते जास्त अशक्तपणा जाणवणं अतिसाराची समस्यां छातीत जळजळ होणं बद्धकोष्ठता होणं टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार  तुळस  तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या. सफरचंदाचा रस सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल. लसूण लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं. लवंग लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार. मध मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा Read More »

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या

Hair Dryer : केस कोरडे करावयाचे आहे मग उन्हात कोरडे कारणे हे चांगले पर्याय आहे. पण जर हवामान ढगाळी पावसाळी किंवा थंडीचे असेल केसांना कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो.  जर आपण नियिमतपणे ड्रायरचा वापर करता तर मग या पासून होणारे तोटे आणि खबरदारी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. केसांना नवीन स्टाइल देण्यासाठी हेयर ड्रायर वापरतात पण ह्याच्या पासून होणारे तोटे देखील त्वरितच दिसून येतात.  हेयर ड्रायरचा अत्यधिक वापर केसांच्या नैसर्गिक सौंदर्याला काढून टाकतो. तर ह्याच्या दररोज वापर केल्याने केसांमध्ये कोंडा होणं, क्लिडेंट, निस्तेज आणि कोरडे होणं सारख्या समस्या वाढतात. या मुळे केस रुक्ष आणि निर्जीव होऊन तुटू लागतात.  या पासून तोटे होण्याचे एक कारण म्हणजे या मधून निघणारी उष्णता आहे जी केसांच्या मुळाला नुकसान देते आणि केसांना दोनतोंडी करते.  खबरदारी काय घ्यावयाची  हेयर ड्रायरचा वापर करताना हे लक्षात ठेवा की केसांपासून याची दुरी 6 ते 9 इंच असावी. असे केले नाही तर केसांमध्ये कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटू लागतील. ड्रायरचा वापर करण्याच्या पूर्वी केसांमध्ये नरिशमेंट सीरम लावावे, जेणे करून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांना काहीही नुकसान होऊ नये आणि केस मऊ व्हावे. आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर ड्रायरचा वापर करणे योग्य राहील. जसे की केस कुरळे आहे, रुक्ष आहे, मऊ आहेत किंवा रेशमी आहेत, त्यानुसार आपल्याला तापमान किंवा वेळेची आवश्यकता असेल. ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडीशनींग करणे विसरू नका. बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे न वापरल्यामुळे केस कोरडे होण्यासह गुंततात, या मुळे ते तुटतात. रुक्ष आणि कोरड्या केसांमध्ये शक्य असल्यास कमी ड्रायर वापरा किंवा कोल्ड ड्रायर वापरा कारण या मध्ये आयन असतात जे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या हवेत उष्णता कमी असते. जर आपल्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करणे आवश्यक आहे तर केसांना नियमितपणे तेल लावा, जेणे करून केसांना पुरेशे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने हे केसांमधील पोषण काढतो. केस बळकट आणि पोषित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, दही इत्यादी समाविष्ट करावे जेणे करून केसांना पोषण मिळेल.

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या Read More »

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी

Health Tips: आज अनेकजण वजन वाढल्यामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र त्यांना काहीच फायदा होत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला आज लिंबू आणि गुळापासून वजन कमी करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.  आम्ही तुम्हाला सांगतो लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.  काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे सध्याच्या काळात चांगलेच वजन वाढले आहे. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली आहे. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते.  मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.  या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.  या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  कसे करते काम  गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.  लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.  गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.  कसा बनवायचा काढा  एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता. 

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी Read More »