DNA मराठी

health tips

Lemon

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी

Health Tips: आज अनेकजण वजन वाढल्यामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र त्यांना काहीच फायदा होत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला आज लिंबू आणि गुळापासून वजन कमी करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.  आम्ही तुम्हाला सांगतो लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.  काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे सध्याच्या काळात चांगलेच वजन वाढले आहे. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली आहे. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते.  मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.  या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.  या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  कसे करते काम  गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.  लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.  गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.  कसा बनवायचा काढा  एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता. 

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी Read More »

Gavha

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Health Tips: पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो.  तसे, तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसी मध्ये ह्याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? पेरू प्रमाणेच त्याची पाने ही देखील खूप उपयुक्त असतात.  हे जाणुन घ्या, या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बेक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेन्टरी गुणधर्म असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊ या पेरूच्या पानाचे फायदे.  पोट दुखी आणि उलट्या मध्ये देखील आराम देतात पेरूच्या पानात अँटी बेक्टेरियल गुणधर्म असतात, अशा मध्ये त्याच्या पाण्याच्या सेवन केल्याने आपल्या पोटाचे दुखणे दूर होऊ शकतात. तसेच हे आपल्याला उलट्यांपासून देखील आराम देतात. यासाठी आपण पेरूच्या 5 -6 पानांना 10 मिनिटे उकळवून घ्या आणि नंतर गाळून त्याचे पाणी प्या.  सांधे दुखीचा त्रास दूर करतो  सांधे दुखी मध्ये देखील पेरूची पाने फायदेशीर आहे. या साठी आपण पेरूची पाने वाटून त्याचे लेप बनवा आणि त्या लेपाला सांध्यांवर लावावे, या मुळे आपल्याला वेदनेपासून आराम मिळेल. मधुमेहात देखील फायदेशीर पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जातात. वास्तविक हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं. या शिवाय हे शरीरातील जटिल स्टार्च साखरे मध्ये बदलण्यापासून रोखत, ज्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतं. दाताच्या दुखण्यापासून आणि हिरड्यांची सूज कमी करतं पेरूच्या पानाचे पाणी दात दुखणं, हिरड्यांची सूज आणि तोंडाच्या छाला पासून आराम देण्याचे काम करतं. आपण याचे पाने उकळवून त्याचा पाण्याने गुळणे करा. असे केल्यास आपल्याला खूप आराम मिळेल.

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »

Turmeric

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क

Health Tips: बदलत्या लाईफस्टाईल यामुळे आज आपल्या आजूबाजूला अनेक आजार पसरले आहे. यामुळे केव्हा कोणाला काय होणार? हे सांगता येत नाही.  मात्र पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली यावर घरघुती उपाय म्हणून आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता.   आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे.  आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते. २. शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात. ३. साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी. ४. शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा. ५.अंगावरील पूरळ दूर होतात. ६.आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.  दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

Health Tips: गुणकारी आहे आंबेहळद; जाणून घ्या ‘हे’ फायदे व्हाल थक्क Read More »

Dry Figs

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Figs Benefits: आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट म्हणून अंजीरची ओळख आहे. अंजीरमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या लेखात आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याचे फायदे सांगत आहोत. हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे जाणुन घ्या. अंजीर खाण्याचे फायदे पचन सुधारण्यासाठी अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचनासाठी चांगले असते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी आणि बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी दूर करण्यासाठी अंजीर खाणे चांगले. रक्तदाब नियंत्रणासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी अंजीरला आहाराचा भाग बनवावा. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत अंजीर खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होऊ शकते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीर खावे. वजन कमी करण्यासाठी अंजीर वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये फायबर असते ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि अन्नाची लालसा कमी होते. अंजीर खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते. अशा स्थितीत वजन कमी करण्यास मदत होते. मजबूत हाडांसाठी अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. हाडांच्या आरोग्यासाठी अंजीराचा आहारात समावेश करावा. ज्यांना अशक्तपणा आणि सांधेदुखीची समस्या आहे त्यांनी अंजीर खावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंजीर खाणे चांगले आहे. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आजारी पडणे. जे लोक वारंवार आजारी पडतात त्यांनी अंजीरचा आहारात समावेश करावा. अंजीरमध्ये असलेले जीवनसत्त्वे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगली असतात.

Figs Benefits: अनेक आजारांपासून मिळणार सुटका! दररोज खा अंजीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »