DNA मराठी

DNA Marathi News

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Threat: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने बॉलीवूडमध्ये एकच खडबड उडाली आहे. तर पुन्हा एकदा सलमान खानला धमकी मिळाली आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स गेन्सकडून ही धमकी आल्याचा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीचा तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसांत सलमानला सहाव्यांदा धमकी मिळाली आहे. तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्याला ही धमकी देण्यात आली आहे. खरे तर हे गाणे लॉरेन्स आणि सलमानने एकत्र करून लिहिले आहे. हे गाणे लिहिणाऱ्याला महिनाभरात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे धमकीत म्हटले आहे. वृत्तानुसार, ‘गीतकार गाणे लिहू शकणार नाही’ अशी धमकी देण्यात आली होती. या मेसेजमध्ये सलमान खानला थेट आव्हान देण्यात आलं आहे. ‘सलमान खानकडे ताकद असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे’, असे म्हटले आहे. याआधी गुरुवारीच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्याच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांनंतर आता शाहरुखला धमक्या आल्या आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शाहरुख खानला धमकी देणारा कॉल वांद्रे पोलिस स्टेशनला आला आणि 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबरला सलमानला धमकीही मिळाली होतीसलमान खानला 4 नोव्हेंबरला आणखी एक धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला पकडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. व्यवसायाने वेल्डर असलेल्या या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली.

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी Read More »

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द

Iran Israel War : पुन्हा एकदा मध्य आशियावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलने शनिवारी पहाटे इराणवर हवाई हल्ले केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इराणवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या लष्करी कारवाई केली असं इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पश्चिम आशियातील इराण-समर्थित अतिरेकी गट – गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह – इस्त्रायलशी आधीच युद्धात असताना या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील सर्वांगीण युद्धाचा धोका वाढतो. इराणमधील लष्करी टार्गेटवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी एका पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणची सत्ता आणि त्याचे समर्थक 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर वारंवार हल्ले करत आहेत. त्यात इराणच्या जमिनीवरून थेट हल्ले समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही हा अधिकार आहे आणि उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी टार्गेटवर टार्गेट करून हल्ले केले, त्यामुळे मर्यादित नुकसान झाले. इराणच्या सशस्त्र दलाचे हे विधान सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर वाचण्यात आले, परंतु यादरम्यान हल्ल्यात झालेल्या नुकसानीशी संबंधित कोणतीही फोटो दाखवण्यात आली नाहीत. इराणच्या सैन्याने दावा केला की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मर्यादित केले आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द Read More »

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक

Maharashtra Crime News: चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विठ्ठल पवार यांनी 24 ऑक्टोबर रोजी पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत असून मात्र आतापर्यंत घरी आली नसल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे, (वय 25) रा.कुक्कडवेढे, रा.चिचोंडी पाटील यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक Read More »

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात

Congress First Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहे. तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. काँग्रेसकडून पुढील एक-दोन दिवसात आपली दुसरी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »