DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20241031 WA0004

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

1000027380

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

1000021644

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

1000018577

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द

Iran Israel War : पुन्हा एकदा मध्य आशियावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलने शनिवारी पहाटे इराणवर हवाई हल्ले केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इराणवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या लष्करी कारवाई केली असं इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पश्चिम आशियातील इराण-समर्थित अतिरेकी गट – गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह – इस्त्रायलशी आधीच युद्धात असताना या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील सर्वांगीण युद्धाचा धोका वाढतो. इराणमधील लष्करी टार्गेटवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी एका पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणची सत्ता आणि त्याचे समर्थक 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर वारंवार हल्ले करत आहेत. त्यात इराणच्या जमिनीवरून थेट हल्ले समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही हा अधिकार आहे आणि उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी टार्गेटवर टार्गेट करून हल्ले केले, त्यामुळे मर्यादित नुकसान झाले. इराणच्या सशस्त्र दलाचे हे विधान सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर वाचण्यात आले, परंतु यादरम्यान हल्ल्यात झालेल्या नुकसानीशी संबंधित कोणतीही फोटो दाखवण्यात आली नाहीत. इराणच्या सैन्याने दावा केला की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मर्यादित केले आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द Read More »

1000018609

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक

Maharashtra Crime News: चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विठ्ठल पवार यांनी 24 ऑक्टोबर रोजी पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत असून मात्र आतापर्यंत घरी आली नसल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे, (वय 25) रा.कुक्कडवेढे, रा.चिचोंडी पाटील यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक Read More »

1000016774

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात

Congress First Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहे. तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. काँग्रेसकडून पुढील एक-दोन दिवसात आपली दुसरी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात Read More »

1000014747

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »

1000012592

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

Salman Khan

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. तर आता एका वेगळ्या कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आता सिंघम अगेनमध्ये दिसणार नाही. सलमान खान सिंघम अगेनमध्ये कॅमिओ करणार आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु होती मात्र आता माहितीनुसार सिंघम अगेनमध्ये सलमान दिसणार नाही. निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर लोकांसमोर सादर केला होता. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलरही लोकांना खूप आवडला. या ट्रेलरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहायला मिळाली. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, मुंबईतील गोल्डन टोबॅकोमध्ये एक दिवस शूटिंग होणार होते पण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर ते लगेच रद्द करण्यात आले. रोहित शेट्टी आणि एजे देवगण यांनी एकमेकांशी बोलून निर्णय घेतला की या सर्व वादांमध्ये सलमान खानला शूट करण्यास सांगणे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी देखील सलमान खानच्या कॅमिओशिवाय चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनुसार, आता तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात कॅमिओ करणार नाही. रोहित शेट्टी आणि चित्रपटाच्या निर्मात्याने आता सलमान खानच्या गोपनीयतेचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ 1 नोव्हेंबरला या चित्रपटाची टक्कर होणार आहे.

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण Read More »

FB IMG 1729577662269

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी  स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी Read More »