DNA मराठी

Dhananjay Munde News

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, खरेदी प्रक्रिया योग्यच उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Dhananjay Munde : तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले असून, यास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे व संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रीतसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नेमकं प्रकरण काय? राज्य शासनाने 12 मार्च 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, बॅटरीवर चालणारे स्प्रेयर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मेटाल्डिहाईड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDCL) व महाराष्ट्र स्टेट पॉवरलूम कॉर्पोरेशन (MSPCL) यांच्यामार्फत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा हा शब्द वापरून अनेकांनी मुंडेंची व कृषी विभागाची बदनामी केली होती. या निर्णयाला विरोध करताना Agri Sprayers TIM Association व उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका व जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता. राज्य शासनाने आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की, 2016 मधील DBT योजना व 2023-24 मधील विशेष कृती आराखडा ही दोन्ही योजना स्वतःच्या स्वरूपात वेगळी असून त्यांची उद्दिष्टे ही केवळ शेतकऱ्यांचे हीत एवढेच आहेत. विशेष कृती आराखड्याचा उद्देश शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर पीक उत्पादन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यांचा समावेश असलेले सर्वांगीण पाठबळ देणे हा आहे व तो पूर्णपणे योग्य आहे. शासनातर्फे ॲड. अंतुरकर, ॲड. व्यंकटेश दौंड, ॲड. कुंभकोनी यांनी बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने नमूद केले की DBT योजना व विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणावर चुकीचे भाष्य करून बदनामी साध्य केली. तर याचिकाकर्ते तुषार पाडगिलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत “फोरम शॉपिंग” केल्याबद्दल 1 लाख दंड ठोठावण्यात आला. हा दंड 4 आठवड्यांत हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावा लागेल; अन्यथा संबंधित जिल्हाधिकाऱ्याद्वारे भूमिकराप्रमाणे वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, खरेदी प्रक्रिया योग्यच उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब Read More »

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात

Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले. समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात Read More »

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण

Dhananjay Munde: पुन्हा एकदा देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने सर्वांचे चिंतेत वाढ झाली आहे. आता  कोरोना विषाणूचा महामारी पुन्हा एकदा देशभरात पसरत आहे. कोरोनाचे नवीन सब-व्हेरियंट JN-1 देशभरात पसरू लागले आहे.  राज्यात ही त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहेत. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महाराष्ट्रात, कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. यानंतर रविवारी राज्यात JN.1 चे आणखी 9 रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. देशातील JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले. यानंतर त्याचे काही रुग्ण गोव्यात तर एक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. दरम्यान, राज्यात एकाच वेळी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे 9 रुग्ण आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.  पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात आढळलेल्या 9 JN.1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. धनंजय मुंडे क्वारंटाईन  राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या पुण्यातील मॉडर्न कॉलनी येथील घरी क्वारंटाईन आहेत. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या ते पुण्यातील त्यांच्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. 24 तासांत 50 रुग्ण आढळले रविवारी महाराष्ट्रात 50 नवे कोरोना बाधित आढळले. राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. आज राज्यभरात एकूण 3 हजार 639 जणांची कोविड चाचणी करण्यात आली. JN.1 मधील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत ठाण्यात JN.1 चे सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत.

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण Read More »