Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक
Crime News: झारखंडच्या सरायकेला-खरसावन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, या जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका जोडप्याच्या कथित हत्येप्रकरणी एका किशोरासह दहा जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. जिल्ह्यात दालभंगा चौकीच्या बिझर गावात 13 सप्टेंबरला ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून कुचई परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना अटक केली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून सोमा सिंग मुंडा (46) आणि त्यांची पत्नी सेजादी देवी (45) यांच्यावर गोळीबार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सोमा सिंग मुंडा जागीच मरण पावला, तर सेजादी देवी यांना बंदुकीत बिघाड झाल्यानंतर दडक्याने मारहाण करण्यात आली. 14 वर्षाच्या मुलाने शेजाऱ्याच्या घरी आसरा घेतला अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याचा 14 वर्षांचा मुलगा सानिका मुंडा पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने शेजारच्या घरी आश्रय घेतला. या घटनेमागील कारणांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Crime News: धक्कादायक, जादूटोण्याच्या संशयावरून पती-पत्नीची हत्या, 10 जणांना अटक Read More »









