DNA मराठी

Corona Case

doctor

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

Ahilyanagar News : कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा स्फोटक आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांना न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आलं, आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आली, आणि जाणूनबुजून जास्त प्रमाणात औषधं देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आलं, असा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे. परंतु सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. “कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला याबाबत काहीच माहिती दिली नाही. आम्ही वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.” संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल Read More »

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण

Dhananjay Munde: पुन्हा एकदा देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने सर्वांचे चिंतेत वाढ झाली आहे. आता  कोरोना विषाणूचा महामारी पुन्हा एकदा देशभरात पसरत आहे. कोरोनाचे नवीन सब-व्हेरियंट JN-1 देशभरात पसरू लागले आहे.  राज्यात ही त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहेत. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महाराष्ट्रात, कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. यानंतर रविवारी राज्यात JN.1 चे आणखी 9 रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. देशातील JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले. यानंतर त्याचे काही रुग्ण गोव्यात तर एक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. दरम्यान, राज्यात एकाच वेळी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे 9 रुग्ण आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.  पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात आढळलेल्या 9 JN.1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. धनंजय मुंडे क्वारंटाईन  राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या पुण्यातील मॉडर्न कॉलनी येथील घरी क्वारंटाईन आहेत. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या ते पुण्यातील त्यांच्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. 24 तासांत 50 रुग्ण आढळले रविवारी महाराष्ट्रात 50 नवे कोरोना बाधित आढळले. राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. आज राज्यभरात एकूण 3 हजार 639 जणांची कोविड चाचणी करण्यात आली. JN.1 मधील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत ठाण्यात JN.1 चे सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत.

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण Read More »