DNA मराठी

Congress

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते?

Waqf Amendment Bill In Rajya Sabha: गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 मंजूर लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाला आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली तर 95 खासदारांनी विरोधात मतदान केले. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याने आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर हे विधेयक कायद्याचे रूप घेईल. गुरुवारी लोकसभेतही या विधेयकावर चर्चा झाली. लोकसभेत 288 खासदारांनी पाठिंबा दिला तर 232 जणांनी विरोध केला. किरण रिजिजू यांनी सरकारची बाजू मांडलीराज्यसभेत चर्चेदरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की हे विधेयक विविध भागधारकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आले आहे. ते म्हणाले, “वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे आणि प्रत्येक सरकारी संस्था धर्मनिरपेक्ष असली पाहिजे.” वक्फ बोर्डात बिगर-मुस्लिमांच्या सहभागावर भर देताना रिजिजू म्हणाले की, 22 सदस्यांपैकी फक्त 4 सदस्य गैर-मुस्लिम असतील. विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “भाजप नाही तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.” मुस्लिमांच्या स्थितीवर काँग्रेस कोंडीत सापडलीकिरण रिजिजू म्हणाले, “तुम्ही (विरोधी पक्ष) मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करत आहात. 60 वर्षे काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशावर राज्य केले, परंतु मुस्लिमांसाठी काहीही विशेष केले नाही. आजही हा समुदाय गरिबीत जगत आहे.” ते म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. विधेयकातील प्रमुख तरतुदीवक्फ न्यायाधिकरणांना अधिकार दिले जातील आणि त्यांचा कार्यकाळ स्पष्टपणे परिभाषित केला जाईल.वक्फ बोर्डांना अनिवार्य योगदान 7% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे ऑडिट राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ऑडिटर्सकडून केले जाईल. वक्फ घोषणेपूर्वी महिलांना त्यांचा वारसा मिळू शकेल अशी तरतूद या विधेयकात आहे. तसेच, विधवा, घटस्फोटित महिला आणि अनाथ मुलांसाठी विशेष तरतुदी जोडण्यात आल्या आहेत. सरकारी मालमत्तेवरील वक्फ दाव्याच्या चौकशीची तरतूदसरकारी मालमत्तेवर केलेल्या वक्फ दाव्यांची चौकशी जिल्हाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्याकडून केली जाईल. तसेच, सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते? Read More »

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, सभागृहात विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar: संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली आहे. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती करावी. असं देखील या वेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यातील ही चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची खाली ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असा मुद्दा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला विधानसभेचे अध्यक्ष यांनी यावेळी सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असे आश्वासन दिले.

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, सभागृहात विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली. परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी Read More »

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात राखेची किंमत 600-660 रुपये असताना फक्त 353 रुपये टन राख विकण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात राखेच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण वडेट्टीवार यांनी मांडले. भुसावळ येथील राख विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असताना अर्धी राख मोजमाप न होता विकली गेली. इथे ठरवून भ्रष्टाचार करण्यात आला. यातूनच वाल्मीक कराड सारखे लोक तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. राख विक्रीत जो भ्रष्टाचार झाला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राख विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राख विक्री प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप Read More »

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल

Vijay Wadettiwar : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल Read More »

Rahul Gandhi : ‘धारावीतून काँग्रेसला संजीवनी देणार राहुल गांधी, राजकीय समीकरण बदलणार?

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या मुंबई आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी धारावीत भेट देणार आहे. त्यांच्या या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राहुल गांधी धारावीत काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी सुरू करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली धारावी सध्या तिच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे चर्चेत आहे. येथील स्थानिक लोक सरकारच्या योजनेवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी थेट तिथे पोहोचले आणि लोकांच्या समस्या ऐकल्या आणि आपली उपस्थिती नोंदवली. काँग्रेस याकडे लोकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहे. निवडणुकीवर काँग्रेसचा डोळामुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या तयारीत काँग्रेस पूर्णपणे गुंतली आहे. बीएमसी ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, ज्याचे वार्षिक बजेट सुमारे 60,000 कोटी रुपये आहे. काँग्रेसला या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे. यावेळी पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवू शकतो. बीएमसीमध्ये 227 जागा आहेत ज्यासाठी निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 84, भाजपने 82, काँग्रेसने 31 आणि राष्ट्रवादीने 9 जागा जिंकल्या होत्या. यावेळी निवडणूक समीकरणे बदलू शकतात, कारण शिवसेना आणि भाजप आता वेगवेगळ्या मार्गांवर आहेत. तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न राहुल गांधी 7 मार्च रोजी अहमदाबादला रवाना होतील, जिथे ते गुजरात काँग्रेस नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील. गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती कमकुवत होती, त्यामुळे या भेटीला पुन्हा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मानले जात आहे. काँग्रेसला काय फायदा होईल?राहुल गांधींच्या या भेटीमुळे काँग्रेसला किती बळ मिळेल हे येणारा काळच सांगेल, परंतु पक्षाने प्रत्येक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे हे स्पष्ट आहे. मुंबईतील धारावीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आणि गुजरातमधील कार्यकर्त्यांना भेटून राहुल गांधी यांनी संघटनेला नवा उत्साह देण्याचा प्रयत्न केला आहे. आता या दौऱ्याचा काँग्रेसच्या निवडणूक निकालांवर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल.

Rahul Gandhi : ‘धारावीतून काँग्रेसला संजीवनी देणार राहुल गांधी, राजकीय समीकरण बदलणार? Read More »

अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Harshvardhan Sapkal : सत्तेत येत असताना केलेली आश्वासने याची पूर्तता झाली पाहिजे, सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते वर्धा येथे माध्यमांशी बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मतांचा जोगवा मागत असतांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी. हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली आहे. सोबतच शेतमालाला जो भाव आहे. अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. कापसाला भाव नाही आहे. बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. सेवाग्राम येथील संगम शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे दाखल झाले होते.

अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप Read More »

Shashi Tharoor : काँग्रेसला मोठा धक्का, शशी थरूर पक्षाला ठोकणार रामराम? ‘हे’ आहे कारण

Shashi Tharoor : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर पक्षावर नाराज असून पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. जर असं झालं तर हे काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. जर पक्षाला त्यांची गरज नसेल तर त्यांच्याकडे खुले पर्याय आहेत, असे विधान त्यांनी अलिकडेच केले. त्यामुळे थरूर पक्ष सोडू शकतात का अशी अटकळ बांधली जात आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा?शशी थरूर हे चार वेळा खासदार राहिले आहेत आणि राष्ट्रीय राजकारणातील एक मोठे नाव आहेत. अलिकडेच त्यांनी केरळ काँग्रेसमधील नेतृत्वाच्या कमतरतेबद्दल सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर, त्यांनी पक्षाच्या हायकमांडची भेट घेतली, ज्यामुळे ते पक्ष सोडू शकतात अशी चर्चा सुरू झाली. थरूर यांनी उघडपणे सांगितले की, जर केरळमधील पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकली तर ते निश्चितच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील. त्यांनी असा दावाही केला की विविध सर्वेक्षणांमध्ये त्यांना केरळमधील सर्वात लोकप्रिय काँग्रेस नेते म्हणून दाखवण्यात आले आहे. परंतु त्यांचे हे विधान अनेक काँग्रेस नेत्यांना आवडले नाही आणि पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. थरूर यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रियाकेरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन म्हणाले की, थरूर यांनी मीडियामध्ये अशा गोष्टी बोलू नयेत. ते म्हणाले की… ‘थरूरकडे त्याच्या चुका सुधारण्यासाठी वेळ आहे.’ माध्यमांमध्ये अशी विधाने करणे योग्य नाही. पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य रमेश चेन्निथला यांनीही सांगितले की, पक्षाने नेहमीच थरूर यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या आहेत. थरूर चार वेळा खासदार झाले, केंद्रीय मंत्रीपद भूषवले आणि पक्षाच्या सर्वोच्च संस्थांमध्ये त्यांचा समावेश होता, याची आठवण त्यांनी करून दिली. थरूर यांचा काँग्रेसवर भ्रमनिरास ?थरूर यांच्या अलीकडील विधानांवरून असे दिसते की त्यांना काँग्रेसमध्ये दुर्लक्षित वाटत आहे. ते म्हणाले की, त्याला राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली पाहिजे. काही वरिष्ठ नेत्यांचा असा विश्वास आहे की थरूर यांना तरुण मतदारांना आकर्षित करण्याची जबाबदारी सोपवावी, तर केरळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, थरूर यांनी खरोखरच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे का? की ते फक्त पक्ष नेतृत्वावर त्यांची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी दबाव आणत आहेत? सध्या काँग्रेस हायकमांड या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहे. येत्या काळात, थरूर यांना राजी करण्यासाठी पक्ष कोणती पावले उचलतो आणि थरूर स्वतः कोणता निर्णय घेतात हे पहावे लागेल.

Shashi Tharoor : काँग्रेसला मोठा धक्का, शशी थरूर पक्षाला ठोकणार रामराम? ‘हे’ आहे कारण Read More »

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार

Gyanesh Kumar : देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते 19 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यांच्या जागी डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्ञानेश कुमार कोण आहेत?ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. याआधी त्यांनी गृह मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांची गणना एक अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी व्यक्त केली असहमतीराहुल गांधी यांनी या नियुक्तीबाबत असहमती व्यक्त करत सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, त्यामुळे सरकारने ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?काँग्रेसचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती असावी. परंतु, नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले, ज्यामुळे सरकारला बहुमत मिळाले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “जर नियुक्तीची प्रक्रिया केवळ कार्यकारी मंडळ (सरकार) द्वारे असेल, तर त्यामुळे आयोग पक्षपाती होईल आणि निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.” निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात ?विरोधकांचा दावा आहे की सरकारने असा निवडणूक आयुक्त नियुक्त केला आहे जो कधीही सरकारच्या विरोधात जाणार नाही. ते म्हणतात की जर ही निवड प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर त्याचा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निष्पक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होईल.

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार Read More »

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहेधामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.” “हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा Read More »