DNA मराठी

Central Government

sim card

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या

New SIM Rules:   नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी आता तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन सुरू आहेत, याची माहितीअसणे गरजेचे आहे. बनावट कागदपत्रांद्वारे SIM कार्ड घेणे, मोबाईल कनेक्शनचा गैरवापर आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल कनेक्शनबाबत नियम कडक केले आहेत. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड तुमच्या नावावर असतील, तर नवीन कनेक्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात? दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, भारतातील सामान्य नागरिकाच्या नावावर जास्तीत जास्त 9 मोबाईल कनेक्शन असू शकतात. ही मर्यादा एखाद्या एका कंपनीपुरती मर्यादित नाही. म्हणजेच तुमच्याकडे Jio, Airtel, Vi, BSNL किंवा इतर कंपन्यांचे SIM कार्ड असले तरी सर्व सक्रिय कनेक्शन एकत्र मोजले जातात.  उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या नावावर Airtel चे 3, Jioचे 3 आणि Viचे 3 नंबर असतील, तर एकूण 9 कनेक्शन पूर्ण झाले असे समजले जाईल. अशा परिस्थितीत दहावे SIM कार्ड घेण्यासाठी अर्ज केल्यास नवीन कनेक्शन मिळणार नाही. या राज्यांमध्ये मर्यादा 6 SIMची असम, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी आहे. या भागातील ग्राहकाच्या नावावर जास्तीत जास्त 6 मोबाईल कनेक्शन ठेवता येतात. त्यामुळे या भागातील एखाद्या ग्राहकाकडे आधीच 6 सक्रिय नंबर असतील, तर नवीन SIM कार्ड घेता येणार नाही.  नवीन SIM घेण्यापूर्वी कंपन्या काय तपासणार? नवीन SIM कार्डसाठी अर्ज केल्यानंतर संबंधित टेलिकॉम कंपनी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल कनेक्शन आहेत, याची पडताळणी करेल. जर ग्राहकाने निर्धारित मर्यादा आधीच पूर्ण केली असेल, तर अतिरिक्त मोबाईल कनेक्शन देण्यास नकार दिला जाऊ शकतो.  या प्रक्रियेचा उद्देश केवळ SIMची संख्या नियंत्रित करणे नाही, तर एका व्यक्तीच्या ओळखपत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर SIM कार्ड घेऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, हा देखील आहे. तुमच्या नावावर किती SIM आहेत हे कसे तपासाल? तुमच्या नावावर सध्या किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे घरबसल्या तपासता येते. यासाठी केंद्र सरकारच्या संचार साथी (Sanchar Saathi) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Know Mobile Connections in Your Name’ या सुविधेचा वापर करता येतो. ही सुविधा TAFCOP म्हणूनही ओळखली जाते. दूरसंचार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर या सुविधेद्वारे तुमच्या नावावर जारी झालेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती पाहता येते.  संचार साथीच्या अधिकृत पोर्टलवर तपासा यासाठी सामान्यतः तुमचा चालू मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTPच्या माध्यमातून पडताळणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाईल कनेक्शनची माहिती स्क्रीनवर दिसते.  अनोळखी नंबर तुमच्या नावावर असेल तर? समजा, तुम्ही संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची यादी तपासली आणि त्यात असा नंबर आढळला जो तुम्ही कधी घेतलाच नाही. अशा वेळी ही बाब दुर्लक्षित करू नका. संबंधित नंबरबाबत पोर्टलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच तुम्ही वापरत नसलेले किंवा आता आवश्यक नसलेले कनेक्शनही तपासून त्याबाबत योग्य पर्याय निवडता येतो. दूरसंचार विभागाच्या प्रक्रियेनुसार संशयास्पद कनेक्शनची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते आणि पडताळणी अयशस्वी झाल्यास ते कनेक्शन बंद केले जाऊ शकते.  जुना नंबर बंद केला असेल तर काय? अनेक लोक जुना मोबाईल नंबर वापरणे बंद करतात आणि नवीन नंबर घेतात. मात्र जुना नंबर अधिकृतपणे बंद किंवा निष्क्रिय झाला आहे की नाही, याची खात्री न केल्यास तुमच्या नावावर सक्रिय कनेक्शनची संख्या वाढू शकते. त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी जुन्या नंबरची स्थिती तपासणे फायदेशीर ठरते. विशेषतः अनेक वर्षांपासून वापरत नसलेले नंबर तुमच्या नावावर आहेत का, हे संचार साथीच्या माध्यमातून तपासता येते. सरकारने हे नियम कडक का केले? मोबाईल SIM कार्डचा वापर आता फक्त फोन कॉलसाठी होत नाही. बँकिंग, UPI, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, OTP आणि अनेक डिजिटल सेवांसाठी मोबाईल नंबरचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर अनधिकृत SIM कार्ड सक्रिय असणे गंभीर ठरू शकते. दूरसंचार विभागाने बनावट कागदपत्रांवर घेतलेल्या मोबाईल कनेक्शनविरोधातही मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या संशयित मोबाईल कनेक्शनचे विश्लेषण करून लाखो कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत.

New SIM Rules: नवीन SIM कार्ड घ्यायचे आहे? आधी ‘हे’ नियम जाणून घ्या Read More »

dilip walse patil

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil :राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील Read More »

whatsapp

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण

WhatsApp New Rules: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वापरण्याच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहे. 1 मार्चपासून अनेकांना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, सिम-बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता येणार नाही. हा नियम व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नल मेसेजिंग अँप्सना लागू होतो. हा नियम 1 मार्चपासून लागू होईल आणि कंपन्यांना त्याचे पालन करावे लागेल. सरकारच्या मते, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी वापरला जाणारा नंबर खरा आणि सक्रिय आहे याची पुष्टी करण्यासाठी हे अँप्स सतत सक्रिय सिम कार्डशी जोडलेले असले पाहिजेत. जर सिम काढून टाकले किंवा डिएक्टिव्ह केले तर अ‍ॅपच्या सेवा त्या डिव्हाइसवर कार्य करणार नाहीत. सिम-बाइंडिंग म्हणजे काय? तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट तयार करण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर तुमच्या फोनवर सक्रिय राहिला पाहिजे. जर ते सिम तुमच्या फोनमध्ये नसेल किंवा डिएक्टिव्ह केले असेल तर व्हॉट्सॲप योग्यरित्या कार्य करणार नाही. आतापर्यंत, मेसेजिंग अँप्स तुम्ही लॉग इन केल्यानंतर 6-अंकी ओटीपी टाकून सिमची उपस्थिती सतत तपासत नव्हते. नवीन नियम हे बदलण्यासाठी सेट केला आहे. सिम कार्ड आता सक्रिय आणि फोनमध्ये नेहमीच उपस्थित असले पाहिजे. डिजिटल फसवणूक, बनावट नंबरचा गैरवापर आणि सायबर गुन्हे रोखण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सरकारने हा बदल केला आहे. जेव्हा प्रत्येक खाते सत्यापित सिमशी जोडले जाईल, तेव्हा फसवणूक आणि बनावट खाते ओळखणे सोपे होईल. 1 मार्च 2026 नंतर कोणतीही सवलत नाही दूरसंचार विभागाने (DoT) 28 नोव्हेंबर 2025 रोजी सिम-बाइंडिंग नियम जारी केला आणि कंपन्यांना तो लागू करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मना 1 मार्च 2026 पर्यंत ही प्रणाली लागू करावी लागेल. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की सहा तासांचा ऑटो-लॉगआउट नियम वेगवेगळ्या डिव्हाइसवर लॉग इन केलेल्या वेब किंवा डेस्कटॉप खात्यांवर देखील लागू होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही संगणक किंवा वेबवर व्हॉट्सॲप वापरत असाल, तर तुम्हाला दर सहा तासांनी QR कोडद्वारे पुन्हा लॉगिन करावे लागेल. सर्वसामान्यांवर होणार परिणाम जर तुमचा नंबर ऍक्टिव्ह असेल आणि तुमच्या फोनमध्ये तेच सिम असेल, तर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुमचे व्हॉट्सॲप सामान्यपणे कार्य करत राहील. मात्र जर तुम्ही तुमच्या फोनमधून सिम काढला किंवा दुसऱ्या फोनमध्ये घातला तर तुमचे व्हॉट्सॲप तात्पुरते डीएक्टिव्ह होईल. शिवाय, जर तुमचा नंबर बंद झाला (रिचार्ज अयशस्वी झाल्यामुळे), तर व्हॉट्सॲप पुन्हा पडताळणीसाठी विचारू शकते किंवा अगदी बंद देखील करू शकते.

मोठी बातमी! 1 मार्चपासून अनेकांचे WhatsApp होणार बंद; जाणून घ्या कारण Read More »

ABS System

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया.. का घेण्यात आला निर्णय? जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं. एबीएस काय आहे? अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते. घसरण्याचा धोका होतो कमी अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते ABS कसे काम करते? ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते. ABS चे किती प्रकार आहेत? सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा Read More »

LPG Gas Price

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये मात्र त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन दरानुसार, आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1797 रुपये झाली आहे. कोणत्या शहरात गॅसच्या किमती किती कमी झाल्या?इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 फेब्रुवारीपासून 1804 रुपयांवरून 1797 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1756 रुपयांवरून 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. आजपासून चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा दरआज घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत, 14 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर अजूनही 803 रुपयांच्या जुन्या किमतीत उपलब्ध आहे. लखनौमध्ये या एलपीजी सिलेंडरची किंमत 810.50 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 802.50 आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे.

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर Read More »

Money 1

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

Happy New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कर आणि अनुदानांमध्ये बदलआता 1% TCS (टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स) 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग आणि घड्याळे यांसारख्या लक्झरी वस्तूंवर लागू होईल. कारच्या किमतीत वाढमारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत 4% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.Hyundai ने 25,000 पर्यंत आणि Mahindra ने 3% ने किमती वाढवल्या आहेत. Mercedes-Benz, BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार कंपन्या देखील किमती 3% पर्यंत वाढवत आहेत. जुन्या फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट नसणारव्हॉट्सॲप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करेल. याचा परिणाम Samsung Galaxy S3, Motorola Moto G (1st Gen), HTC One X आणि Sony Xperia Z सारख्या मॉडेल्सवर होईल. UPI पेमेंटची नवीन मर्यादाफीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट मर्यादा 5,000 वरून 10,000 करण्यात आली आहे. या बदलामुळे 123Pay सेवेअंतर्गत ग्रामीण भागातील लहान व्यापारी आणि वापरकर्त्यांना फायदा होईल. या बदलाचा काय परिणाम होतो?2025 चे हे बदल सामान्य ग्राहक आणि बाजाराची दिशा ठरवतील. एकीकडे कर आणि डिजिटल पेमेंटमुळे जीवन सुकर होणार आहे, तर दुसरीकडे रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार Read More »