DNA मराठी

Bollywood update

awarapan 2

Awarapan 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमवले 22 कोटी

Awarapan 2 : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ या चित्रपटाने अखेर 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर ‘शिवम पंडित’ या लोकप्रिय भूमिकेत इमरान हाश्मी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता होती. त्याचा परिणाम आता बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीतही दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी 21 कोटींची कमाई उपलब्ध बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, ‘आवारापन 2’ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 21 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 25 कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. परदेशातील कमाई धरली तर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे जागतिक ग्रॉस कलेक्शन जवळपास 27 कोटी रुपये झाले आहे. मात्र, विविध बॉक्स ऑफिस ट्रॅकर्सच्या आकडेवारीत थोडा फरक दिसत आहे. काही अहवालांमध्ये भारतातील पहिल्या दिवसाची कमाई 20 ते 22 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम अधिकृत आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. इमरान हाश्मीच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग ‘आवारापन 2’च्या या दमदार सुरुवातीचा सर्वात मोठा फायदा इमरान हाश्मीच्या रेकॉर्डला झाला आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. यापूर्वी इमरानच्या चित्रपटांना पहिल्या दिवशी अशी मोठी कमाई मिळालेली नव्हती. ‘आवारापन 2’ने या बाबतीत त्याच्या आधीच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘आवारापन’ला सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, कालांतराने हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये कल्ट फिल्म म्हणून लोकप्रिय झाला. आता त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला मिळालेली एवढी मोठी सुरुवात हा इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी निश्चितच विशेष क्षण मानला जात आहे. ‘आवारापन’च्या जुन्या चाहत्यांचा फायदा ‘आवारापन 2’ला मिळालेल्या चांगल्या ओपनिंगमागे जुन्या चित्रपटाची लोकप्रियता हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. शिवम पंडित हे इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील लक्षात राहणारे पात्र आहे. त्यामुळे या पात्राला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ट्रेलर, गाणी आणि प्रमोशनल कंटेंटमुळे चित्रपटाची चर्चा रिलीजपूर्वीच वाढली होती. सोशल मीडियावरही चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यामुळे पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीला चांगला फायदा झाल्याचे दिसते. ‘बटवारा 1947’ला दिली कडवी टक्कर 14 ऑगस्ट रोजीच सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या ‘बटवारा 1947’ या चित्रपटाचाही थिएटरमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईत मात्र ‘आवारापन 2’ने स्पष्ट आघाडी घेतली. ‘बटवारा 1947’ने भारतात सुमारे 5.75 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस लढतीत इमरान हाश्मीचा चित्रपट वरचढ ठरला आहे. पुढील दोन दिवस ठरणार महत्त्वाचे पहिल्या दिवशी ‘आवारापन 2’ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाच्या यशासाठी शनिवार आणि रविवारचे कलेक्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन शनिवारला आल्याने चित्रपटाला सुट्टीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवरील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई मजबूत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही व्यापार विश्लेषणांनुसार पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपट 80 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो. मात्र, हा अंदाज असून प्रत्यक्ष कमाई प्रेक्षकांचा प्रतिसाद, शोची संख्या आणि शनिवार-रविवारच्या ऑक्युपन्सीवर अवलंबून असेल. इमरान हाश्मीसाठी मोठे कमबॅक? ‘आवारापन 2’ची सुरुवात पाहता हा चित्रपट इमरान हाश्मीच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. एका काळात आपल्या रोमँटिक आणि थ्रिलर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या इमरानने ‘शिवम पंडित’च्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्याच दिवशी मिळालेली 20 कोटींपेक्षा जास्त कमाई ही केवळ चित्रपटासाठीच नव्हे तर इमरान हाश्मीसाठीही मोठी उपलब्धी आहे. आता हा वेग पुढील दिवसांमध्ये कायम राहतो का आणि ‘आवारापन 2’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा आकडा गाठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Awarapan 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमवले 22 कोटी Read More »

akshay kumar

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’

Akshay Kumar : ‘भूत बंगला’ ही या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र येत आहेत . पहिल्या पोस्टरच्या लाँचपासूनच उत्सुकता प्रचंड वाढली होती, त्यातच आलेल्या इंटरेस्टिंग मोशन पोस्टरमुळे चित्रपटाविषयीचा बज आणखी वाढला. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून ही मच-अवेटेड हॉरर-कॉमेडी 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. आज झालेल्या या मोठ्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे ‘भूत बंगला’ अधिकृतरीत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाप तोही या जॉनरमधील उस्ताद प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्या सिनेमॅटिक जादूची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. रिलीज डेटची घोषणा करताना मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले— “बंगल्या मधून एक बातमी आली आहे! 15 मे 2026 ला उघडेल दरवाजा थिएटर्समध्ये भेटूया #BhoothBangla” ‘भूत बंगला’ला एक कंप्लीट एंटरटेनर बनवणारा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. यात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’चे निर्मितीकार्य शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अक्षय कुमार यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या बॅनरखाली झाले आहे. फारा शेख आणि वेदांत बाली सहनिर्माते आहेत. कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली असून स्क्रीनप्ले रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केला आहे. डायलॉग्स रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ Read More »

gotya gangster

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Gotya Gangster : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे. ‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता 26 डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट Read More »

homebound

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक

Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम. “होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय? “होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कोणते चित्रपट नामांकित झाले ? 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक Read More »

sunny deol

Sunny Deol on Media: लाज वाटत नाही का? सनी देओल मीडियावर भडकला

Sunny Deol on Media: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत अनेक दावे करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबाने मीडिया आणि जनतेकडून गोपनीयतेची विनंती केली आहे मात्र तरी देखील सोशल मीडियावर अनेक दावे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत करण्यात येत असल्याने आज अभिनेता सनी देओल मीडियावर भडकला. सनी देओलचा पापाराझींवर राग सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ त्याच्या घराबाहेरचा आहे. सनी देओल त्याच्या घराबाहेर असलेल्या पापाराझीला (फोटो जर्नलिस्ट) पाहताच त्याचा राग भडकला. सनी देओल म्हणतो, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे… तुमच्या घरात आई-वडील आणि मुले आहेत… तुम्ही चु*** असे व्हिडिओ बनवत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का?” सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काय म्हटले? सनी देओलच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “सनी देओलने योग्य काम केले.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सनी देओलचा राग योग्य आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सर, माझ्याकडून त्याला आणखी दोन शिव्या द्या.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “पाजी अगदी बरोबर आहेत.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “भाऊ, त्याला एकटे सोडा, त्याचे वडील बरे नाहीत.” 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या धर्मेंद्रला 13 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देऊन घरी आणण्यात आले. कुटुंबाकडून अधिकृत निवेदनात म्हटले आहे की धर्मेंद्रची घरीच काळजी घेण्यात येत आहे. कुटुंबाने मीडिया आणि जनतेला त्याला गोपनीयता देण्याची विनंतीही केली.

Sunny Deol on Media: लाज वाटत नाही का? सनी देओल मीडियावर भडकला Read More »

saif ali khan

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो…

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान नेहमी सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सर्वांना धक्का देणारा विधान केला आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने त्याची प्रेयसी आणि पत्नीसोबत काम करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. कोणासोबत काम करणे ही सर्वात मोठी चूक आहे? एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफने 90 च्या दशकातील त्याच्या चित्रपटांवर आणि 2000 नंतर आलेल्या बदलांवर चर्चा केली. त्याने असेही म्हटले की त्याची पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच चांगली कल्पना नसते. 90 च्या दशकातील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात आठवून सैफ म्हणाला की लोक त्याला इतक्या संधी मिळाल्याबद्दल भाग्यवान मानत होते. तथापि, त्याने असेही स्पष्ट केले की त्यावेळी त्याला इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम चित्रपट मिळत नव्हते आणि त्याला क्वचितच मुख्य भूमिकांमध्ये कास्ट केले जात असे. पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे ही चांगली कल्पना का नाही असे विचारले असता, सैफ म्हणाला की कालांतराने त्याला जाणवले की तो त्याच्या सहकलाकारांसोबत निरोगी स्पर्धेत चांगले काम करतो. म्हणूनच त्याला वाटते की पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच फायदेशीर नसते. सैफचा धक्कादायक खुलासा सैफने याबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की जर त्याला आणि करीनाला चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्यांना घरातील कामांमध्ये बदल करावे लागतील. तो पुढे म्हणाला की तो अशा दिग्दर्शकाचा शोध घेईल जो त्यांना फक्त पती-पत्नी म्हणून नव्हे तर ते अभिनेते आहेत म्हणून कास्ट करेल.

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो… Read More »

Govinda

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Govind Helath Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या पायाला बंदुकीची गोळी असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि गोविंदा याच्या पायाला लागली.  यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  तर दुसरीकडे याप्रकरणी जुहू पोलीसने पुढील तपास सुरू केला आहे.

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल Read More »