DNA मराठी

Bollywood news

shah rukh khan

FIR On Shah Rukh Khan :  मोठी बातमी, राजस्थानमध्ये शाहरुख खानसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

FIR On Shah Rukh Khan  : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानविरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका कार कंपनीची जाहिरात केल्याबद्दल शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह 7 जन्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार राजस्थानातील भरतपूर येथील रहिवासी कीर्ती सिंह नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शाहरुख आणि दीपिकासह सुमारे 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीचा आरोप आहे की त्याला जाणूनबुजून दोषपूर्ण हुंडई अल्काझर कार विकण्यात आली, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचे जीवन धोक्यात आले. या प्रकरणात, कीर्तीने कारची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात कीर्ती सिंहने न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर, एसीजेएम कोर्ट क्रमांक 2 च्या आदेशानुसार, मथुरा गेट पोलिस स्टेशनमध्ये अर्जाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती म्हणते की तिने 2022 मध्ये हुंडई अल्काझर खरेदी केली होती. तिने ही कार कर्जावर घेतली होती, परंतु काही दिवसांतच कारमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष दिसू लागले. तक्रारदाराचे म्हणणे आहे की जेव्हा गाडीचा वेग वाढवण्यासाठी एक्सीलरेटर दाबला जातो तेव्हा गाडीचा आरपीएम वाढतो आणि गाडी थरथरायला लागते, परंतु गाडीचा वेग वाढत नाही. यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होतो. एफआयआर कोणाविरुद्ध आहे? शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त, कीर्ती सिंग यांनी कंपनीशी संबंधित लोकांविरुद्धही खटला दाखल केला आहे. यामध्ये किम अँसो (सीईओ, ह्युंदाई मोटर इंडिया), तरुण गर्ग (होल टाइम डायरेक्टर आणि सीईओ), नितीन शर्मा (एमडी, मालवा ऑटो सेल्स कुंडली), प्रियंका शर्मा (संचालक, मालवा ऑटो सेल्स कुंडली) आणि इतर एकाचा समावेश आहे. कीर्तीने सांगितले आहे की तिने ही कार बुक करण्यासाठी प्रथम 51000 रुपये दिले. नंतर तिने 10 लाख 3 हजार 699 रुपयांचे कर्ज घेतले आणि उर्वरित रक्कम रोखीने दिली. तिने ही कार 23 लाख 97 हजार 353 रुपयांना खरेदी केली. कीर्तीचा दावा आहे की डीलरने सांगितले होते की गाडीत कोणतीही समस्या येणार नाही आणि जर काही समस्या आली तर आम्ही जबाबदार आहोत. शाहरुख-दीपिका का अडकले आहेत? कीर्ती सिंगचा आरोप आहे की शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे या कार कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत आणि त्यांनी कंपनीच्या खराब गाड्यांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले आहे, त्यामुळे दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत. ती म्हणते की दोन्ही कलाकार या गुन्हेगारी कृत्यात समान भागीदार आहेत. या प्रकरणात, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 आणि 120-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शाहरुख 1998 पासून ह्युंदाईचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, तर दीपिका 2023 मध्ये कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

FIR On Shah Rukh Khan :  मोठी बातमी, राजस्थानमध्ये शाहरुख खानसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं कारण काय? Read More »

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.” निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.” तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च Read More »

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू

Ajaz Khan : सोशल मीडियावर नेहमी काहींना काही कारणाने चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता एजाज खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. माहितीनुसार मुंबईत एजाज खानविरोधात एका माहिलने बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, एका 30 वर्षीय महिलेने एजाज खानविरुद्ध मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या चारकोप पोलिसांनी सांगितले की, अभिनेता एजाज खानविरुद्ध अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा मोबाईल फोन बंद होता. एजाज खान पोलिसांच्या संपर्कातून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. असे सांगितले जात आहे की एजाज खानने अभिनेत्रीला प्रपोज केले होते आणि तिच्या घरी गेल्यानंतर त्याने हा बलात्कार केला. एवढेच नाही तर एजाज खानने महिलेला तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. बलात्कारासोबतच एजाज खानवर समाजात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शो दरम्यान एजाजने स्पर्धकांना अश्लील कृत्ये करण्यास सांगितले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी एजाज खान आणि उल्लू अॅपवर कारवाईची मागणीही केली. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सर्व भाग काढून टाकले आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार, पोलिसांकडून शोध सुरू Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक!

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि शाहरुख खानच्या टायगर वर्सेस पठान या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना होती मात्र आतापर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सलमान खानने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. सलमानची बिग बजेट फिल्म ठप्पएका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. “एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत,” असे सलमान म्हणाला. “टायगर वर्सेस पठान” वर काम नाही!सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. “आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही,” असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला. तर दुसरीकडे “अंदाज अपना अपना 2” साठी आमिरसोबत काम करण्यास आपण एक्साइटेड आहोत असं सलमान म्हणाला. सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, “हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार.” “बजरंगी भाईजान 2” शक्य, पण कधी?बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, “हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे.” मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक! Read More »

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

Sonu Sood Arrest Warrant: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या कथित प्रकरणात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. माहितीनुसार, न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले. हा खटला लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या 10 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांनी बनावट रिझिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचा दावा केला होता. सोनू सूदला साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्यात आले होते परंतु तो हजर राहिला नाही, त्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आले. सोनू सूदला न्यायालयासमोर हजर करालुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले. आदेशात म्हटले आहे की सोनू सूद, (मुलगा, पत्नी, मुलगी) रहिवासी, घर क्रमांक ६०५/६०६ कासाब्लँक अपार्टमेंट्स, यांना समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आले आहे परंतु ते हजर राहिले नाहीत (समन्स किंवा वॉरंटची सेवा टाळण्यासाठी फरार झाले आणि पळून गेले). तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. आदेशात पुढे असे म्हटले आहे की तुम्हाला हे वॉरंट १०-०२-२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये ते कोणत्या तारखेला आणि कोणत्या पद्धतीने अंमलात आणले गेले आहे किंवा ते का अंमलात आणले गेले नाही याचे कारण प्रमाणित करणारे पृष्ठांकन असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी Read More »

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »

Prasad Oak : दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर !

Prasad Oak : मराठी सिनेमा विश्वात आजवर अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन गेले आणि नव्या वर्षात अश्याच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे ! ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उभी केली जात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव ” बाबुराव पेंटर “ मराठी सिनमांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट होताना दिसतात आणि आता अश्या एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय ही मराठी सिनेमा विश्वा साठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक याने या बद्दल सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून या बद्दल माहिती दिली असून प्रसाद बाबुराव पेंटर यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या बद्दल बोलताना प्रसाद सांगतो ” बाबुराव पेंटर यांच्या जीवनाराव आधारित भव्य कलाकृती निर्माण होत आहे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम त्यासाठी झटून काम करत आहेत. दिग्गज बाबुराव पेंटर यांची भूमिका मला साकारायला मिळणं हा श्री नटराजा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे” आता या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार कधी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार काय गोष्ट असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 2025 वर्षात प्रसाद ओक अनेक चित्रपट करणार असून आता या चित्रपटासाठी देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Prasad Oak : दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक साकारणार बाबुराव पेंटर ! Read More »

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

Amrita Khanwilkar : 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली. बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. ” वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी ! Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »