DNA मराठी

BJP

chandrashekhar bawankule on ajit pawar

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने गेल्या सात वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांच्या या गंभीर आरोपामुळे आता महायुती मधील घटक पक्ष भाजप देखील आक्रमक झाला असून अजित पवारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांच्या अडचणीत वाढ होईल असं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादांनी जे मानलं खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपवर टीकाटिपणी केली आहे, भारतीय जनता पार्टी बद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की मित्र पक्षाचे मनभेद आणि मतभेद होणार नाहीत, अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला हव्या होत्या,परंतु जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाळलं नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना म्हणाले की, रवींद्र चव्हाण म्हणाले ती गोष्ट खरी आहे की मित्र पक्षात खडा पडेल असं विधान कोणी करू नये. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निवडणूक लढण्यासाठी काहीही व्हिजन नसतं, तेव्हा लोक निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा भावनात्मक करून मतं घेण्याचा प्रयत्न करतात असं बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे विकास काम करू शकत नाही तसेच त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जाहीरमान्यावर देखील भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनाची व केलेला जाहीरनामा काहीच पूर्ण करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची काम केली, ते उद्धव ठाकरे करू शकत नाही असेही ते म्हणाले. मुंबईला सर्व जगातलं सुविधायुक्त शहर, भारतातला सर्वात विकसित शहर, मुंबईचा व्हिजन 2047 चा मॅप देवेंद्रजींनी केला आहे . उद्धव ठाकरे यांच्या कार्यकेळाचा अभ्यास जर केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, किती खोटारड्या घोषणा केल्या त्या लोकांना माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेला जाहीरनामा किंवा दिलेली आश्वासन, काहीच पूर्ण करणार नाही.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले Read More »

oplus 16908288

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले. विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Harshwardhan Sapkal: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा Read More »

shivraj singh chouhan

Shivraj Singh Chouhan : बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा आणणार

Shivraj Singh Chouhan : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कडक असा नवीन ‘बियाणे – कीटकनाशक कायदा’ आणत आहे. निकृष्ट बियाणे किंवा कीटकनाशकांमुळे पीक वाया गेल्यास संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई दिली जाईल. तसेच, दोषींवर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) २१ व्या हप्त्यापोटी केंद्राने ३६७ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स), बाभळेश्वर येथे आयोजित ‘शेतकरी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ‘अटारी’ (पुणे) चे संचालक डॉ. एस. के. रॉय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यु. एस. कदम आदी उपस्थित होते. केंद्रीय कृषीमंत्री चौहान म्हणाले, “शेती क्षेत्रात दरवर्षी नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुनाच अभ्यासक्रम शिकवणे योग्य नाही. भारतीय कृषी संशोधन परिषदेने अभ्यासक्रम बदलासाठी दहा वर्षांची वाट न पाहता, गरजेनुसार त्यात तत्काळ बदल करावेत,” अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनाचे प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र व विश्वासार्ह यंत्रणा उभारण्यात येईल. यामुळे विषमुक्त शेतमालाला बाजारात दुप्पट भाव मिळणे शक्य होईल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. तसेच, युरिया व खतांच्या तुटवड्याचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ८६२ कोटी रुपयांची मदत दिली आहे. ‘थेट लाभ हस्तांतरण’ (DBT) प्रणालीमुळे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांची साखळी नष्ट झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनाचे अनुदानही विनाविलंब व पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “जिल्हाधिकाऱ्यांनी पीक नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला सूचना घ्याव्यात. विमा कंपन्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी” , असे निर्देश त्यांनी दिले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २९ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच, नव्याने सर्वेक्षण करून उर्वरित कच्च्या घरांसाठीही पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिला जाईल. ‘लखपती दीदी’ अभियानांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Shivraj Singh Chouhan : बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा आणणार Read More »

mns

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिले आहे. त्यामुळे तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रभाग क्रमांक 17 मधील मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहे. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे.केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजप आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब Read More »

election

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली?

Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते. चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले. या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे…. विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे. लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली? Read More »

BJP

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी प्रभाग क्रमांक 1 (ब )शारदा दिगंबर ढवन प्रभाग क्रमांक 2 (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके ( ड ) निखील बाबासाहेब वारे प्रभाग क्रमांक 3 (अ )उषा शिवाजीराव नलावडे (ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे प्रभाग क्रमांक 5 ( ब ) धनंजय कृष्णा जाधव प्रभाग क्रमांक 6 (अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम ( ब) सोन्याबाई तयागा शिंदे (क )सुनिता श्रीकृष्ण कुलकणी ( ड) करण उदय कराळ प्रभाग क्रमांक 7 (अ) वषां रोहन सानप (ब )पुष्पाताई अनिल बोरुडे ( क )वंदना विलास ताठे (ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे प्रभाग क्रमांक 8 ( ब )आशाबाई लोभाजी कातोरे प्रभाग क्रमांक 9 (ब )पद्माताई विजयकु‌मार बोरुडं ( ड )महेश राम लोंढे प्रभाग क्रमांक 10 (अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा (ब ) शितल अजय ढोण (क )मयुरी सुशांत जाधव (ड) सागर राजू मुतोडकर प्रभाग क्रमांक 11 ( अ) विकास (विकी) किशोर वाघ ( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी (ड ) सुभाष सोपानराव लोंढे प्रभाग क्रमांक 12 (क )अमोल सुरेश निस्ताने ( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी प्रभाग क्रमांक 15 ( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर ( ड )सुजय अनिल मोहिते प्रभाग क्रमांक 16 ( क )विजय मोहन पठारे ( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले प्रभाग क्रमांक 17 (क) कमल जालिंदर कातकर ( ड )मनोज शंकर कोतकर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर Read More »

ahilyanagar

Ahilyanagar Municipal Corporation Election: महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार?

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता सध्या धूसर होताना दिसत आहे. जागावाटपावरून सुरू असलेले मतभेद टोकाला पोहोचल्याने शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे, म्हणजेच वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र या बैठकीतही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गट आपल्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर ठाम असून, त्या जागा सोडण्यास स्पष्ट नकार देत असल्यानेच वाद अधिक चिघळल्याचे समजते. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीकडून नव्याने समतोल जागावाटपाची भूमिका मांडण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आज संध्याकाळपर्यंत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, महायुती टिकणार की तुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Election: महायुती अडचणीत, शिवसेना शिंदे गट वेगळी चूल मांडणार? Read More »

bjp

BMC Election BJP First List :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा संपूर्ण लिस्ट

BMC Election BJP First List : मुंबई महानगरपालिका साठी सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना शिंदे गटासोबत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील मनसेसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित सोबत आघाडीची घोषणा केली आहे. तर आता भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधून मनिषा यादव तर प्रभाग क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आणि प्रभाग क्रमांक 16 मधून श्वेता कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांची पहिली यादी 1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर 2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर 3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल 4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी 5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे 6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह 7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर 8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे 9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर 10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे 11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा 12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल 13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव 14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा 15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे 16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा 17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी 18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना 19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम 20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले 21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल 22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर 23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी 24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर 25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड 26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह 27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी 28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव 29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक 30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे 31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत 32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे 33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर 34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला 35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत 36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे 37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर 38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे 39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती 40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे 41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या 42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग 43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार 44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील 45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा 46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव 47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत 48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते 49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन 50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ 51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे 52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण 53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर 54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया 55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा 56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई 57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत 59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे 60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील 61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले 62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर 63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप 64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित 65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर 66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

BMC Election BJP First List :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा संपूर्ण लिस्ट Read More »

sanjay raut

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut on NCP Alliance : पुण्यातील राजकारणात सध्या हाय वॉल्टेज ड्रामा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेसाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आता अजित पवार कोणतीही सुरक्षा न घेता कुठे तरी निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे मला माहिती नाही असं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला माहिती नाही, त्यांच्या पक्षात काय चाललय त्यावर मी काय बोलणार. अजून तिथे काही घडत नाही आहे. तर दुसरीकडे यावेळी राऊत यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी बरोबर युतीसाठी आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्यात असल्याची माहिती दिली आहे. तसेच आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्याचं समाधान केलंय. आमच्या सोबत असावेत आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्यात, आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल. आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत, आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच नाही असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मनसे युती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप पूर्ण झालं आहे पण ठाण्यात महत्व वेगळं आहे, भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे. लोकसभा विधानसभेच गणित वेगळं होतं तिथे आमची केवळ भाजपशी लढाई असेल असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on NCP Alliance: पुण्यात दोन्ही NCP एकत्र येणार? संजय राऊत स्पष्टच बोलले Read More »