DNA मराठी

Ajit Pawar

ajit pawar

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध विषयासंबंधी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीस आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले. सुपा – पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही त्यांनी दिले. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आय.टी. च्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व उद्योजक देखील उपस्थित होते.

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले Read More »

buldhana

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा

Buldhana News : राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यातच आता हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान “एक मराठा लाख मराठा” असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने “एक गोर, सव्वा लाखेर जोर” हे घोषवाक्य देखील पाहायला मिळालं. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Buldhana News : आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal: हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही, छगन भुजबळ असं का म्हणाले?

Chhagan Bhujbal: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना पक्षावर टिका होणार… हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. निवडणुकीत उतरताना आपल्या कार्यकर्त्यांकडे विषय असला पाहिजे. फक्त पक्षाचे लेबल उपयोगी पडणार नाही त्यासाठी झटून काम करावे लागणार आहे. पक्ष सोबत असेलच असे स्पष्ट करतानाच पक्षावर टिका होणार… हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही असे आत्मविश्वास निर्माण करणारे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असून धाडसी व ठोस निर्णय घ्यायचे आहे. आजच्या चिंतन शिबिरातून आराखडा तयार करणार आहोत त्याला नागपूर डिक्लेरेशन म्हणून मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंतन शिबिरात दिली. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे असून लोकशाही – न्याय – समता या विचारावर आज शिबिर होत आहे. अनेक वर्षे समाजकारण, राजकारण करणारे लोक उपस्थित आहेत. सर्वधर्मसमभाव मानणारा हा पक्ष आहे. शिव – शाहू – फुले- आंबेडकर यांची विचारधारा घेऊन काम करत आहोत असेही विचार अजित पवार यांनी मांडले. पक्षाच्यावतीने बुथ, जनसंवाद, रोजगार शिबिरे घेणार आहोत. त्यावेळी पक्ष लोकांच्याजवळ राहणार आहोत. सत्ता किंवा पदासाठी आम्ही पाऊल उचलले नव्हती तर राज्याची प्रगती व्हावी… ठोस निर्णय घेता यावा या हाकेला ओ दिली आणि आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनेत्राताई पवार,कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदींसह पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Chhagan Bhujbal: हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही, छगन भुजबळ असं का म्हणाले? Read More »

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ Read More »

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »

ajit pawar

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत

Beed Railway: बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आज नव्याने १५० कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच दि. १७ सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग ५० टक्के असून, आजवर शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने १५० कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे २६१ किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च ४ हजार ८०५ कोटी रुपये इतका आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे २ हजार ४०२ कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी २३ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता आणखी १५० कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण १५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विभागीय, जिल्हास्तरीय तसेच मंत्रालयीन पातळीवर विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. “अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत Read More »

Maharashtra Government: प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध ; राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Government: ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण 1062 सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय 28 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, ग्रामपंचायत पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्र हे अधिकृतरीत्या स्वीकृत करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 1087 ग्रामपंचायतींसाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत महाआयटीला माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी व पासवर्ड प्राप्त झाले आहेत. सदर आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये सेवा केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून तालुका पातळीवर हँड्स-ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा दिलासा एका ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

Maharashtra Government: प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध ; राज्य सरकारची मोठी घोषणा Read More »

cabinet meeting

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यातील सुमारे १ हजार ७८९ उपसा सिंचन योजनांच्या खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच त्याचा थेट फायदा या उपसा सिंचन योजनांशी निगडीत शेतकऱ्यांना होणार आहे. या वीजदर सवलत योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध करणे सुलभ झाले आहे. यातून शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे यापुर्वी जाहीर केलेली ही वीजदर सवलत योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात आणि त्यांच्या कृषि उत्पन्नात वाढ करण्यात सहायभूत ठरली आहे. त्यामुळेच या कल्याणकारी योजनेस ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत अतिउच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकासाठींचा सवलतीचा वीजदर प्रति युनीट रुपये १.१६ रुपये आणि स्थिर आकार दरमहा २५ रुपये रुपये (प्रति के.व्ही.ए.) आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजना ग्राहकासाठींचा सवलतीचा वीजदर प्रति युनिट एक रुपया आणि स्थिर आकार दरमहा रुपये १५ रुपये( प्रति अश्वशक्ती) अशी सवलत ३१ मार्च, २०२७ पर्यंत कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या सवलतीमुळे महावितरणला महसुली तुटीच्या भरपाईकरिता राज्य शासनाकडून २०२५-२६ करिता या वार्षिक वर्षात ८८६ कोटी १५ लाख रुपये आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ८७२ कोटी २३ लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ Read More »

तुम्ही सांगा तिथे मी येतो…, मराठा आरक्षण जीआरवरून विखे पाटलांवर रोहित पवार भडकले

Rohit Pawar On Maratha Reservation: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुपली आहे. मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची टीका करत आहे. तर दुसरीकडे जीआरवर युक्तिवाद करायचा असेल तर तुम्ही मला कुठेही बोलवा सगळी माहिती घेऊन मी तुमच्याकडे येतो व मी युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही देखील जो जीआर काढलेला आहे तो कसा टिकणार तसेच सर्व समाजाला कशा पद्धतीने तुम्ही न्याय दिला आणि उद्या जाऊन जर यावर कोर्टात चॅलेंज झाला तर आरक्षणाच्या जीआर ला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारला आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे महायुतीने जर एखादा जीआर काढला असेल तर त्याला पाठिंबा सर्व मित्र पक्षांनी द्यायला पाहिजे सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे मात्र सध्या मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भाचे क्रेडिट घेण्यासाठी दुसऱ्या मित्र पक्षाला विश्वासात घेता येत नाही घेता येत हे आम्हाला सांगता येणार नाही अशा शब्दात एक प्रकारे रोहित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये असलेले नाराजी नाट्य ही चव्हाट्यावर आणली. तसेच पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले मराठा आरक्षणाचे उपस्थितीमध्ये अनेक इतर मंत्री देखील होते तसेच महाजन हे देखील ओबीसीचे नेते त्या ठिकाणी होते ज्यावेळेस जरांगे यांचे उपोषण सोडण्यात आले त्यावेळेस ओबीसीचे जयकुमार गोरे हे देखील मंचावर उपस्थित होते तर मराठा नेते ओबीसी नेते हे एकत्र बसून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जीआर काढला असेल यावर कोणीही आक्षेप घेतला नसेल तर लोकांचेही असे मत झाले असेल सर्व मान्य हा जीआर आहे हे सगळं असं असताना काही मंत्री काही नेते नाराजी व्यक्त करत असतील तर याला काय म्हणायचे असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले. तसेच येणाऱ्या काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटलेलाच ठेवायचा म्हणून पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद हा झाला पाहिजे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे मात्र इतिहास बरोबर इतर प्रश्न देखील दुर्लक्षित होतात. एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होत आहे लोकांचे हाल होत आहे आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही या मूलभूत विषयांवरती चर्चा करायला सरकार उत्सुक नाही सत्ताधाऱ्यांना केवळ ओबीसीविरुद्ध मराठावाद हाच महत्त्वाचा वाटतोय. मराठी अमराठी व्हेज नॉनव्हेज हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रश्नांमध्येच नागरिकांना गुंतवून ठेवून मूलभूत प्रश्नांना फाटा देण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

तुम्ही सांगा तिथे मी येतो…, मराठा आरक्षण जीआरवरून विखे पाटलांवर रोहित पवार भडकले Read More »

beed

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे

Beed News : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट, अनाधिकृत वृक्षतोड, यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, वाहनही धुवून घेतले असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला असून कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते. कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे Read More »