DNA मराठी

Ahmednagar Accident News

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.   सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू

 Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. रात्री अडीचच्या सुमारास एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरसह तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एसटी बस आणि इको कार यांच्यात धडक झाली. रात्री अडीच वाजता धवलपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला, त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.  दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ जाम झाला होता. निलेश रावसाहेब भोर, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी, प्रकाश रावसाहेब थोरात, सचिन कांतीलाल मंडलीचा, अशोक चीमा केदार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात सुयोग अडसूळ नावाचा तरुण जखमी झाला आहे. अपघातातील उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगरमधील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News : जिल्ह्यात भीषण अपघात! बस-ट्रॅक्टर आणि कारची धडक, 6 जणांचा मृत्यू Read More »

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.  पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता.  रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारवर टेम्पो उलटला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला.  या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू Read More »