Dnamarathi.com

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.

 मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे. 

 सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *