DNA मराठी

Ahilyanagar Crime

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून Read More »

kotla

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी

Kotla Crime : नगर शहरातील कोठला परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री गोळीबाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज चेंबर समोर बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाअकरा वाजता गोळीबार झाला. यात अबरार मुख्तार शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने, अबरारवर गोळीबार केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी Read More »

shevgaon

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल Read More »

img 20250830 wa0020

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ओडीसा राज्यातुन विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464 रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवुन अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोनि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांचे दोन विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी पोनि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. जाणारे रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचुन थांबले असता बातमीतील ट्रक येतांना दिसल्याने नवनाथ अंबादास मेटे (वय 38 वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय 31 वर्षे, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबीनवरील टपावर 6 गोण्यामध्ये 30,22,625-रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकुण 80,83,464 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त Read More »

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद

Ahilyanagar News : मानवी हक्कांचा भंग करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगरात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुरुडगाव परिसरात छापा टाकून तब्बल दोन वर्षांपासून कैदेत ठेवून गोठ्यात जबरदस्तीने काम करण्यास लावण्यात आलेल्या तीन वेठबिगारांची सुटका केली. या प्रकरणी जाकिश उर्फ बबड्या काळे (वय 35, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली असून, आणखी एका संशयिताविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद आणि बळजबरीचे वास्तव तपासानुसार, अटक आरोपीने एक कामगार नागपूरहून तर दोन कामगार उत्तर प्रदेशहून आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना आपल्या घराशेजारील गायीच्या गोठ्यात कैद करून ठेवले होते. बाहेर जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली होती. कामगारांवर सतत लक्ष ठेवून, मारहाण करत व धमकावत त्यांच्याकडून गोठ्यातील कामे करवून घेतली जात होती. या काळात पीडितांना मोबदला न देता केवळ जेवणापुरतेच सोय करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. खात्रीशीर माहितीवर छापा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना आरोपीकडे तीन जणांना बेकायदेशीररीत्या कैद करून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. पथकाने बुरुडगाव परिसरातील आरोपीच्या घरावर छापा टाकून तिघांना सुरक्षितपणे मुक्त केले. पीडितांची ओळख सुटविण्यात आलेल्या तीन कामगारांपैकी एक जण नागपूरचा आहे, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, आरोपीने त्यांना वेठबिगार म्हणून आणले होते आणि दोन वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याशिवाय, जबरदस्तीने काम करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास सुरू या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम 370 (मानव व्यापार), 342 (बेकायदेशीर कैद), 323 (मारहाण), 506 (धमकी) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा सहकारी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. पीडितांना पोलिस संरक्षणाखाली सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगार प्रथेला मोठा धक्का बसला असून, अशा प्रकारचे प्रकरणे उघड करण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तीन वेठबिगारांची सुटका, दोन वर्षांपासून गोठ्यात कैद Read More »

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या राहुरी येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन दोन इसम नगरच्या दिशेने येत असताना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल 37 लाख 50 हजार रुपये व दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा एकूण 44 बंडल ज्याची किंमत या आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. तर नोटा बनवण्याचे साहित्य 18 लाख रुपये असे एकूण तब्बल 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

बनावट नोटा प्रकरणी तीन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची कारवाई Read More »

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक

Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक Read More »