Dnamarathi.com

SUV CarSUV Car

 SUV Car :   जर तुम्ही नवीन वर्षात एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात अनेक एसयूव्ही कार्सच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे तुम्ही जर नवीन कार एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर कमी किमतीमध्ये कार खरेदीसाठी तुमच्याकडे अवघ्या काही दिवस शिल्लक आहे. चला मग जाणून घेऊया कोणत्या कारची किंमत नवीन वर्षात वाढणार आहे. 

महिंद्रा कार्सच्या किमती वाढवणार आहे

महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच आपल्या कार्सच्या किमती वाढवणार आहे. महिंद्राचा भारतातील प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा इतर अनेक वाहन निर्मात्यांनी आधीच जाहीर केले आहे की ते जानेवारी 2024 पासून त्याच मार्गाचा अवलंब करतील. विक्रीच्या प्रमाणात भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने पुढील वर्षी 1 जानेवारीपासून देशातील कारच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. टाटा मोटर्सने जानेवारी 2024 पासून आपल्या गाड्या महाग होणार असल्याचेही जाहीर केले आहे.  

भारतातील वाहन उत्पादक सहसा दरवर्षी त्यांच्या कारच्या किमती वेगवेगळ्या प्रमाणात वाढवतात. काहीवेळा, किंमत वाढ ऑटोमेकरच्या संपूर्ण रेंजवर लागू होते. तर काही वेळा निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ दिसून येते. काही कार उत्पादक वर्षातून एकदा किंमती वाढवतात, तर काही वर्षभरात अनेक वेळा किमती वाढवण्याची घोषणा करतात. तथापि, महिंद्र आपल्या संपूर्ण प्रवासी वाहन रेंजच्या किमती वाढवणार की निवडक मॉडेल्सच्या किमती वाढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एमजी मोटरनेही किंमत वाढवणार 
दरम्यान, एमजी मोटरने ग्राहकांना धक्का दिला आहे. कार उत्पादक कंपनी आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवणार आहे.  कार निर्मात्याने एका निवेदनात म्हटले आहे की ही वाढ एकूण महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या किमतीमुळे आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे. मात्र, ही वाढ नेमकी काय असेल याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. एमजी मोटरने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की ते या वर्षाच्या शेवटी उच्च किमतींचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय देखील लागू करेल. हे जानेवारीपासून लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *