Modi Government: देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले तालुका अध्यक्ष मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, अशोक चोरमले,भिमराव फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यापुर्वी खासदार विखे पाटील यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी उत्फुर्त स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.
सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारचा काळ खुप प्रभावी आणि आव्हानात्मक होता. तरी कारभाराचा वेग, सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, मजबूत पायाभूत सुविधा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित समस्यांचे निराकरण यांना उच्च प्राधान्य दिले. आज देशात निर्णय घेणारे आणि जबाबदार सरकार आहे. या देशातील सामान्य माणुस, शेतकरी, कामगार, महिला आणि युवा वर्गाला पाठबळ देण्याऱ्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाल्यामुळे देशातील जनतेचा विश्वास हा मोदींजींवर असल्याचे त्यांनी सांगितले.
ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यामुळे देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविण्यासाठीची ही निवडणूक आहे. भविष्य घडविण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही, ही भाावना देशातील जनतेची झाली आहे. त्यामुळेच ४०० जागा जिंकुण भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या सरकार मधुनच सुटू शकतात. यापुर्वीही केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रस्ते विकासाला मोठा निधी उपलब्ध झाला. भविष्यातही विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत. युवकांच्या रोजगारासाठी काम करायचे आहे. यासाठीच सत्ताधारी पक्षाचा खासदार होणे महत्वाचे आहे. ज्यांची सत्ता येणार नाही. त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांची काळजी आहे. ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, जी देशाला या आव्हानात्मक काळातून बाहेर काढण्यास सक्षम आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे सुरक्षा कवच आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनंतर भारत बलवान बनत आहे. आगामी काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश स्वावलंबन आणि आर्थिक विकासाच्या नवीन उंची गाठण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
मोदी सरकारच्या काळात देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात अनुच्छेद ३७० हटविण्यात आले. नागरिकता संशोधन विधेयक आणण्यात आले. राम मंदिर पुर्ण करण्यात आले. तीन तलाकच्या मुद्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. देशातील सैन्याला बळ देण्यात आले वायुसेनेत आठ अपाचे लढावू हेलिकॉप्टर सामील झाले. ३६ राफेल विमाने भारतीय सैन्यात दाखल झाली. आयुष्यमान भारत ३ कोटी हून अधीक लोकांना आरोग्य कवच मिळाले. अटल पेंशन २ कोटी हुन अधीक लाभार्थी. प्रधानमंत्री किसान योजना, जनधन योजना,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, श्रमिक कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजनांमुळे भारत विकसीत देशाकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत जगात भारत महासत्ता म्हणुन उदयास येईल. यामुळे मोदीशिवाय देशात कोणताही पर्याय नाही. हे आता माध्यमांच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.