Dnamarathi.com

Sujay Vikhe News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता. 

यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पेडगाव येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रताप पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात अनेक वर्षे सत्ता भोगूनही जे इतरांना करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात करून दाखविले. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाचे नावलौकिक निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाने मागील १० वर्षात विविध क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करत प्रगती साधली आहे. त्याच बरोबर सर्वाधिक सरकारी योजना निर्माण करून त्या शेवटच्या लाभार्थांपर्यंत पोहचवून त्यांचे जिवनमान उंचावले आहे. शेतकरी, महिला, व्यापारी, तरुणांसाठी मोदी सरकारने भरीव काम केले आहे. यामुळे ३० कोटीहून अधील लोक गरिबीमुक्त झाले आहेत. यामुळे देशाने मोदींनाच प्रंसती देत दोन वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा त्यांचीच निवड होणार आहे. असा विश्वास खा. विखे पाटील यांनी सांगितले. 

सुजय विखे पाटील यांनी देशाच्या योग्य नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग्य पर्याय आहेत. सध्या देशात त्यांच्या इतका प्रभावी आणि दुरदुष्टी असलेला एकही नेता नाही. २०४७ पर्यंत भारत महासत्ता बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. मागील १० वर्षात त्यांनी केवळ विकास कामांचे ट्रेलर दाखविले, अजून पुर्ण पिच्चर बाकी आहे. यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर जिल्ह्यातही त्याच्या मार्फत मोठा निधी आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा विकासाचे पर्व महायुतीचा उमेदवारच सुरू ठेऊ शकतो. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *