DNA मराठी

Shrirampur Crime : श्रीरामपूर पोलिसांची ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीवर कारवाई ; जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका

fraud

Shrirampur Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ या कंपनीमार्फत अल्पवधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

कारवाईचा तपशील

अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर (ता. श्रीरामपूर) येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत संदिपराज मोहिणीबाई कपाटे (रा. हनुमानवाडी, भोकर शिवार) याच्या घरातून लोकांकडून पैसे स्वीकारल्याबाबतची कागदपत्रे, पासबुक, चेकबुक, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीकडे ठेवी स्वीकारण्याबाबत कोणताही अधिकृत परवाना आढळून आलेला नाही.

नागरिकांना आवाहन

सदरच्या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीमध्ये ज्या नागरिकांनी जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवले असतील, त्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुलभ होण्यासाठी त्वरित श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह आपला जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सतर्क राहा, सुरक्षित राहा असे आवाहन श्रीरामपूर पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *