DNA मराठी

चुका करूनही अधिकारी दयावान? | जमिनीचे वाटप व चुका-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह | अहिल्यानगर बातमी

sawedi land scam kind officer apologizes for mistak

जमिनीचे वाटप, चुका-दुरुस्ती आणि शंका निर्माण करणारी प्रक्रिया

Sawedi land scam – अहिल्यानगर जिल्ह्यात जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित वादविवाद, चुक दुरुस्ती आणि अभिलेखातील फेरफार या मुद्द्यांवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोंदींमधील तफावत आणि विसंगतीमुळे प्रशासनावरील विश्वासार्हता डळमळीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

चुकांवर चुकांची भर
या प्रकरणात सुरवातीला चूक दुर्स्ठी लेख समोर आला नाही मात्र या प्रकरणाला वाचता झाल्यानंतर अप्पर अधिकारी यांच्याडे तो सदर झाला, १३ जुलै १९९२ रोजी झालेल्या जमिनीच्या वाटपाची नोंद आहे. मात्र, २७ ऑगस्ट १९९२ रोजी झालेल्या चुक दुरुस्तीत हीच माहिती हि मुळ खरेदी खाताशी सुसंगत नाही त्यामुळे  यावरही शंका निर्माण होते, उदाहरणार्थ, सर्व्हे नं. २४५/वर ०.६३ हे.आर. क्षेत्रफळ वडील अब्दुल अजीज डायाभाई यांच्या नावावर दिसते. पण वाटपात मात्र सर्व्हे नं. २४९/बर चे क्षेत्र मुलगा डायाआई अब्दुल अजीज यांच्या नावावर दाखवले आहे. ही विसंगती गंभीर शंका निर्माण करत आहे.

सूचीची दोन रूपे!
सूची क्र. २ मध्ये हस्तलिखित स्वरूप आणि प्रिंटेड स्वरूप यामध्ये स्पष्ट फरक आढळतो. सरकारी कामकाजासाठी मागणी केली असता प्रिंटेड प्रत सादर केली जाते; मात्र अभिलेखात हस्तलिखित सूची नोद  घेताना दिसते. एकाच दस्तऐवजाची दोन भिन्न स्वरूपे कशी,  हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय.

फेरफारांच्या कहाण्या नित्याच्या
जमिनीच्या नोंदींमध्ये मूळ अभिलेख, त्यानंतरची चुक दुरुस्ती आणि नंतर सादर होणारी कागदपत्रे यामध्ये विसंगती आढळणे ही अपवादात्मक बाब नाही. अनेकदा हेतुपुरस्सर फेरफार होतो का, असा संशय मुळजमीन मालकांच्या वारसांना आहे,

धोक्याची घंटा
नोंदींमध्ये एका बाजूला वडिलांचे नाव, तर दुसऱ्या बाजूला मुलाचे नाव दिसणे; हस्तलिखित आणि प्रिंटेड सूचीतील फरक — या चुका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर प्रशासनालाही अडचणीत टाकतात. यामुळे न्यायालयीन लढाया, वाद आणि सामाजिक तणाव वाढत आहे,

शेतकऱ्यांचा विश्वास धोक्यात
आजच्या घडीला रेकॉर्ड ऑफ राईट्स व ७/१२ उतारे शेतकऱ्यांचे गीता, कुरण आणि बायबल मानले जाते. पण जर ह्याच कागदपत्रांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले, तर शेतकऱ्यांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होणार हे निश्चित.

मूलभूत प्रश्न
जमिनीच्या प्रकरणात चुका दुरुस्त करायच्या की लपवायच्या?
हा प्रश्न अधिकाधिक टोकदार होत आहे. जमिनीचे प्रकरण आर्थिक व भावनिक दृष्ट्या संवेदनशील असल्याने, प्रशासकीय ढिसाळपणा केवळ वादग्रस्तच नाही तर धोकादायकही ठरू शकतो.

मी किती दयावान

असे असतानाही अधिकाऱ्यांची भूमिका मात्र वेगळीच दिसते. “मी किती दयावान आहे हे दाखवायचे प्रयत्न आम्ही करत आहोत; खरेदी कोणी केली याने काय फरक पडतो? शेवटी नोंद करायची ती आमचीच आहे”, अशा थाटात अधिकाऱ्यांची वक्तव्ये ऐकू येतात. यावरून स्पष्ट होते की या प्रकरणात गोंधळ कमी करण्याऐवजी तो अधिक वाढवण्याकडेच प्रशासनाचा कल आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *