DNA मराठी

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार

satara crime

Satara Crime: शिरवळ (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला. या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले.

गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

गोळीबाराचा हा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली.

गोळीबारामुळे मुख्य रस्त्यावर पळापळ शिरवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची पळापळ झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे.

संशयित आरोपींची नावे कळली, तपास पथके रवाना झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *