Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे. तर आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर मध्ये हल्ला झाला
अत्यंत निर्गुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिला असेल त्यांच्या डोक्यावर इतर भागात दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यावस्थत होते. असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हल्ला करताना भारतीय जनता पक्षा कडून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्री त्याच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था काढणारे हे ढिंडोरे आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे.
आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. जर ही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो सध्या हे भाजपच्या काळामध्ये. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे.असेही संजय राऊत म्हणाले.
तर राज ठाकरे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घ्यायची गरज नाही.
त्यांनी स्वतः पक्ष शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्रातल्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेणार असं वाटत नाही. असं संजय राऊत म्हणाले.