DNA मराठी

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जाहिरात देणारे मंत्री कोण? रोहित पवारांचा हल्लाबोल

rohit pawar on devendra fadnavis

Rohit Pawar On Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जीआर जारी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्यातील सर्व वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. सध्या या जाहिरातीवरून विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

या प्रकरणात रोहित पवार यांनी एक्स वर ट्विट करत म्हटले आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता.

या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे.

मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. असं रोहित पवार म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *