Ram Shinde: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी खा. सुजय दादा विखे पाटील यांच्या रुपाने उमदा शिलेदार याला निवडून पाठवायचे आहे. जामखेड कर्जत मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयासाठी बुथ स्थरावर नियोजन करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील राजेवाडी, धानोरा अणखेरीदेवी येथील भाजपा बुथ कमिटीच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की आज संपूर्ण भारतातील लोकांची राम मंदिर व्हावे म्हणून इच्छा होती.ही इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे. यामुळे त्यांच्या हमीवर देशाचा विश्वास निर्माण झाला आहे.
आ. राम शिंदे म्हणाले की, विरोधी आमदारांनी सांगितले की जामखेडला कुकडीचे पाणी देतो, पण त्या दिवसापासून आजपर्यंत लोक खोर घेऊन दारावर लोक पाण्याची वाट बघत आहेत. पण अद्यापही पाणी काही आले नाही. लोक तुमच्या खोट्या भुलथापांना बळी एकदा बळी पडले होते, आता पडणार नाहीत याचा विश्वास आहे.
खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, गेल्या ५० वर्षापासून आमचे कुटुंब जनतेच्या सेवेत आहे. यामुळे सातत्याने जनतेने आम्हाला आशिर्वाद देऊन सत्तेत ठेवले आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ मिळाल्याने जिल्ह्याचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपली विकास कामे घराघरात पोहचवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजयदादा काशीद, जामखेड बाजार समितीचे सभापती पैलवान शरद दादा कार्ले, डॉ भगवानदादा मुरूमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच बापूराव ढवळे भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळ घुरी, माजी संचालक मनोज काका कुलकर्णी, आणखेरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रभांजी आढाव, सचिव रमेश तुपेरे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, माजी सरपंच दादासाहेब वारे, माजी सरपंच अशोक राऊत, युवा नेते अजित यादव, राहुल चोरगे, शाहुराव जायभाय, पाटोदाचे सरपंच सदाशिव गवांदे, संतोष राऊत, परशराम राऊत, महादेव जायभाय, गणेश जायभाय, हर्षद शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते,