Ahmednagar News: राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहमदनगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना आपला जाहिर पाठिंबा दिल्याने महायुतीत आणखी एका पक्षाची भर पडली, तर महविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण राज ठाकरे यांचे तरुणांमध्ये मोठे क्रेज आहे. त्याच बरोबर मराठी माणसांचा आजही राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. यामुळे राज्यभर त्यांचा कार्यकर्ते महायुतीला मदत करणार असल्याने निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होईल असे खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावेळी ४०० पारचे उद्दीष्ठ आता सहज गाठता येणार आहे. तर इंडी आघाडीची हवा देशातून मिटत चालली असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.