Maharashtra Crime News : पुण्यातील विमाननगर परिसरातील ‘द नॉयर’ (रेड जंगल) पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केलीये. या कारवाईमध्ये महिला व पुरुष मिळून 50 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलायं.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक अतुल कानडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात सुमारे 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 178 विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच अवैध मद्यव्यवसायासाठी वापरलेले साहित्य खुर्चा, सोफा, लाकडी टी-पॉय, लोखंडी लोखंडी साहित्य, स्पीकर्स, साऊंड सिस्टम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदींचा समावेश आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदा पार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 21 भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक कानडे यांनी दिली. या प्रकरणात एकूण 52 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पब चालक व व्यवस्थापक असे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.






