दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधून ‘वोटर अधिकार यात्रा’ ला सुरुवात केली आहे. या यात्रेचा उद्देश देशातील निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या ‘वोट चोरी’च्या आरोपांवरचे मुद्दे मांजाणते समोर मांडणे आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे.
१३०० किमी, २० जिल्ह्यांतून प्रवास
हि यात्रा सुमारे १३०० किलोमीटर लांबीची ही यात्रा बिहारमधील २० जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधी विविध ठिकाणी पायपीट करणार असून, ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या यात्रेसाठी जोरदार तयारी केली आहे.
१ सप्टेंबरला पटण्यात महामेळावा
यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी पटण्याच्या गांधी मैदानात होणार असून, तेथे मोठा जनसमुदाय जमण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी या सभेतून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ‘वोट चोरी’ आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या अभावावर कठोर भूमिका मांडणार आहेत.
राजकीय पार्श्वभूमी
विश्लेषकांचे मत आहे की, बिहारमधून सुरू झालेली ही यात्रा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरुण मतदार, शेतकरी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न मानला जातो.
काँग्रेसची भूमिका
पक्षाचे म्हणणे आहे की, लोकशाही प्रक्रियेचे रक्षण आणि मतदार हक्कांचे संरक्षण हीच या यात्रेची खरी ताकद आहे. कोणत्याही प्रकारे मताधिकार हिरावला जाणार नाही, हा संदेश काँग्रेस या मोहिमेद्वारे देत आहे.