DNA मराठी

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त, चौघांना अटक

img 20260316 wa0004

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त करत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात केलेल्या कारवाईत अजित सागर कसबे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने तो पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार १३ मार्च रोजी पोलिस पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले

दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कोंढव्यातील काकडे वस्तीमधून प्रकाश तुळशीराम पवार, मुस्ताक इक्राइम शेख आणि ओंकार दयानंद पवार या तिघांना अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *