DNA मराठी

वक्फ सुधारणा कायदाचा निषेध, ‘लाईट बंद’ आंदोलनाला नगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Waqf Amendment Act : केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा कायदा 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 30 एप्रिल रोजी घरामधील, आपल्या परिसरातील आणि कार्यालयातील लाईट बंद करून निषेध करण्याचे आवाहन केले होते. या अहवानाला संपूर्ण देशात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

देशातील अनेक शहरात बुधवारी रात्री 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद करून केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा कायदा 2025 कायदाचा निषेध करण्यात आले तसेच सरकारने कायदा मागे घ्यावा अशी मागणी देखील यावेळी नागरिकांमधून करण्यात आली.

नगर शहरात देखील 30 एप्रिलच्या रात्री 9 वाजता अनेक भागात लाईट बंद करून या कायदाचा निषेध करण्यात आले. अनेक भागात 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद ठेवण्यात आली होती. तसेच या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून फिरता बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नगर शहरातील नागरिकांनी 9 ते 9.15 पर्यंत लाईट बंद ठेवून वक्फ सुधारणा कायदा 2025 चा निषेध केला. तर दुसरीकडे जेव्हापर्यंत सरकार कायदा मागे घेणार नाही तेव्हापर्यंत आम्ही विरोध करणार अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *