Dnamarathi.com

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे.

भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते.

INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे.

INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *