PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
तर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले.
मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.