Dnamarathi.com

Prajakta Tanpure

Prajakta Tanpure – गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारकडून 40 हुन अधिक गावांचा समावेश दुष्काळजणीमध्ये करण्यात आला. मात्र नगरच्या गावांचा सुरुवातील यामध्ये समावेश नव्हता.

 दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळजन्य सदृश्य परिस्थिती निकष तसेच लाभ आपण पहिले तर कोणताही फायदा महसुली मंडळांना होणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पहिले तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणायचा प्रकार आहे, अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, कृषी पंपांना वीजबिलात सूट दिली मात्र खरी गरज पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महत्वाचा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहे याच्या वीजबिलात सूट देणे गरजेचे आहे. यांचे कनेक्शन बंद केले जाऊ नये मात्र महावितरण कडून यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. यामुळे  दुष्काळजन्य परिस्थिती पाहता यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी तनपुरे यांनी केली.

पिकविम्याबाबत अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. मात्र खूप कमी लोकांना याचा फायदा मिळाला आहे, अशी खंत यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. केवळ सरकारकडून घोषणा केल्या जात असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल असे धोरण सरकारने राबवावे,  पीकविम्याची अग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली.

दूधदराबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, आमच्या जिल्ह्यात दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुधाचे दर काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रुपयांवर गेलेले दुधाचे दर आता 20 ते 25 रुपयांवर आले आहे. महाविकास आघाडीने दूध खरेदी करून दुधाचे दर नियंत्रित ठेवले होते. मात्र या सरकारच्या काळात दुधाचे दर पडलेले  आहे मात्र ग्राहक खरेदी करत असलेले दुधाचे  दर काही कमी झाले नाही आहे.  यामुळे सरकारनं दुधाच्या दरबाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *