DNA मराठी

Accident Policy : अरे वा! फक्त 328 रुपयांत 5 लाखांचे अपघात विमा संरक्षण

post office

Accident Policy :   सामाजिक सुरक्षा व आर्थिक समावेशन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत नागरिकांसाठी ‘ग्रुप अॅक्सिडेंट गार्ड पॉलिसी’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.डाक विभाग,महाराष्ट्र सर्कल यांच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली.

ही पॉलिसी अपघातामुळे होणारा मृत्यू,अपघाती रुग्णालयात दाखल होणे तसेच कायमस्वरूपी पूर्ण किंवा अंशतःअपंगत्व अशा परिस्थितींमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान करते.अत्यंत परवडणाऱ्या प्रिमियममध्ये उपलब्ध असल्याने ही योजना कामगार, शेतकरी,स्वयंरोजगार करणारे तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू, रुग्णालयात दाखल झाल्यास खर्चासाठी मदत, कायमस्वरूपी अपंगत्वासाठी भरपाई तसेच मृत विमाधारकाच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध आहे. सुलभ नोंदणी प्रक्रिया व सोपी, त्रासमुक्त दावा व्यवस्था ही या योजनेची आणखी एक वैशिष्ट्ये आहेत.

या पॉलिसीसाठी वार्षिक प्रिमियम फक्त 328 रुपयांपासून सुरू होत असून त्यावर 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.अधिक प्रिमियममध्ये 10 लाख व 15 लाख रुपयांचे विमा संरक्षणही उपलब्ध आहे.

ही सुविधा आयपीपीबी बचत खातेधारकांना त्यांच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस,पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून सहजपणे घेता येणार आहे.इंडिया पोस्टचे व्यापक जाळे विमा सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची ही योजना नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेला बळ देणारी,आर्थिक स्थैर्य निर्माण करणारी व नागरिक-केंद्रित सेवा वितरणाचा उत्तम नमुना असल्याचे डाक विभागाने नमूद केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *