Rohini Khadse: पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ल्याबाबत काल संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत संपन्न झाली. पण या हल्ल्याबाबत देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांनी अजून माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मांडली आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्व. मनमोहनसिंग यांचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, काल परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पाहताना एक गोष्ट जाणवली.
पहलगाम येथे झालेला हल्ला हा कोणत्या धर्मावर झालेला हल्ला नसून आपल्या देशावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यात भारताचे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, इतका मोठा हा हल्ला होता. पण प्रसार माध्यमांशी बोलताना न देशाचे पंतप्रधान दिसले, न देशाचे गृहमंत्री दिसले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अशा वेळी भारताचे माजी पंतप्रधान स्व. मनमोहनसिंग यांची 26/11 हल्ल्याच्या वेळची पत्रकार परिषद आठवली असंही त्या म्हणाल्या.