Hyundai Car Discount : तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात काही कार्सवर तब्बल 70 हजारांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये सर्वात भारी कार खरेदी करु शकतात.
माहितीनुसार, सध्या ह्युंदाई त्यांच्या जुन्या मॉडेल्सवर मोठी सूट देत आहे. या ऑफर फक्त निवडक 2024 मॉडेल्सवरच वैध आहेत. यामध्ये Aura, i20, Grand i10 Nios आणि Exter यांचा समावेश आहे.
Hyundai Exter
ह्युंदाईची एंट्री लेव्हल एसयूव्ही एक्सटर भारतीय बाजारपेठेत टाटा पंचशी स्पर्धा करते. हे मॉडेल गेल्या वर्षी बाजारात आले. सध्या या कारवर 40 हजारांची रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या कारमध्ये ग्रँड आय10 निओस आणि ऑरा सारखेच इंजिन आणि गिअरबॉक्स आहे. तुम्ही ही कार सीएनजी व्हर्जनमध्ये देखील खरेदी करू शकता.
Hyundai Aura
होंडा अमेझ आणि मारुती डिझायरशी स्पर्धा करणाऱ्या ह्युंदाई ऑरावरही मोठी सवलत उपलब्ध आहे. या कारच्या 2024 मॉडेलवर 53000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याचे इंजिन आणि गिअरबॉक्स ग्रँड आय10 निओससारखेच आहेत. त्याचा सीएनजी प्रकार देखील बाजारात उपलब्ध आहे.
Hyundai Aura i20
ह्युंदाई आय20 ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक आहे. या कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर उपलब्ध आहे. तथापि, स्पोर्टियर एन लाईन आवृत्तीवर कोणतीही सूट मिळत नाही. ह्युंदाई आय20 ही टाटा अल्ट्रोज आणि मारुती बलेनो सारख्या कारशी स्पर्धा करते.
Hyundai Grand i10 Nios
सवलतीच्या यादीतील चौथी कार म्हणजे Hyundai Grand i10 Nios, ज्याच्या 2024 मॉडेलवर 68,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर सीएनजीसह सर्व प्रकारांवर लागू आहे. ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते.