Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले.
तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.