Pradnya Satav : राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष कामाला लागलं असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसला रामराम करत पक्षाची साथ सोडणार आहे.
आमदार प्रज्ञा सातव 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. आमदार प्रज्ञा सातव 2021 पासून काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदार आहे. पक्षात सुरू असणाऱ्या गटबाजीच्या राजकारणामुळे प्रज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीपैकी एक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा हा मोठा धक्का मानला जात आहे.






